विद्यमान विश्वस्तांनी डिसेंबर २०१९ मध्ये ट्रस्टच्या उपक्रमांची संपूर्ण जबाबदारी घेतली. प्रमुख उपक्रम, प्रगती आणि राबवलेले सामाजिक कार्यक्रम खालील प्रमाणे.
१) श्री सद्गुरू शंकर महाराजांच्या समाधीची देखभाल करणे हे ट्रस्टचे नित्य आणि प्रमुख उद्दिष्ट आहे. सर्व पूजा आणि धार्मिक याग आयोजित करताना एकसमानता कायम राहावी आणि मतभेद होऊ नयेत यासाठी एक तपशीलवार पद्धत, आचारसंहिता तयार करून प्रचलित पद्धती व नियमांची माहिती पुस्तिका तयार केली आहे. सदर माहिती पुस्तिका सह धर्मादाय आयुक्तांना सादर केली आहे. ज्यामुळे समाधी मठातील कामकाज शांततेत आणि सुरळीत चालण्यास मदत झाली.
२) सोमवार, गुरुवार आणि अष्टमीच्या दिवशी मोठ्या प्रमाणात होणार्या गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी स्टील स्ट्रक्चर आणि बॅरिकेड्सच्या सहाय्याने चांगली आणि सोयीस्कर दर्शन व्यवस्था तयार केली. ज्याचे सामान्य भक्तांनी आणि स्थानिक पोलिस ठाण्याने विशेष कौतुक केले. ऑनलाइन दर्शन सेवा, युट्यूब आणि फेसबुक पेजद्वारे भाविकांसाठी उपलब्ध करून दिली. भाविकांच्या माहितीसाठी समाधी मंदिराची व श्री शंकर महाराजांची तपशीलवार माहिती असलेली संपूर्ण वेबसाइट विकसित केली.
३) श्री वाडेकर यांनी पद्मा सोसायटी मधील मालमत्ता मठाला दान केली. सदर बंगल्यात कर्मचारी आणि मठात येणारे पाहुणे यांच्यासाठी निवास व्यवस्था उपलब्ध करून दिली आहे.
४) महसूल आणि भांडवली खर्चाच्या खरेदीसाठी ऑफिस डॉकेट तयार करण्याची प्रणाली विकसित केली आहे. पारदर्शी कारभार करण्यासाठी सर्व पावत्या आणि देयके प्रत्येक सभेत विश्वस्त मंडळासमोर ठेवली जातात.
५) समाजाभिमुख कार्यक्रम राबवून भक्तांना online देणग्यांसाठी आवाहन करण्यात आले. त्यामुळे लॉकडाऊन असूनही विश्वस्त लिक्विड फंडाची बचत करू शकले आणि अतिरिक्त रक्कम रु. ३०१ लाख मुदत ठेवीमध्ये ठेवू शकले.
६) ट्रस्टच्या दानपेटीतील रक्कमेवरील व्याजाचे नुकसान टाळण्यासाठी “दरमहा दानपेटी उघडण्याचा” सुधारित न्यायालयीन आदेश प्राप्त करण्यात आला. दरमहा दानपेटी उघडल्यामुळे नोटा खराब होवून होणारे नुकसान टाळले जाते.
७) लेखापरीक्षण वार्षिक आर्थिक अहवाल वेळेत सादर केले. ट्रस्टला देणग्यांसाठी 80G अंतर्गत कपातीसाठी मंजूरी मिळवली.
८) CSR उपक्रमांतर्गत कॉर्पोरेट देणग्या मिळविण्यासाठी ट्रस्टची CSR00016307 या क्रमांद्वारे नोंदणी करण्यात आली.
९) दुर्गा-अष्टमी पालखी सोहळा व प्रत्येक सण आणि अष्टमीला भजन-कीर्तन व गायनाचे कार्यक्रम आयोजीत करण्यात आले.
१०) अन्नदान आणि अन्नधान्य वितरणासाठी उपक्रम
• धर्मादाय आयुक्तांच्या हस्ते कोल्हापूर पूरग्रस्तांना १० टन तांदूळ आणि १ टन साखरेचे वाटप करण्यात आले.
• पुण्यातील आंबील ओढा पूरग्रस्तांना तांदूळ आणि धान्य वाटप करण्यात आले. गरजू शालेय संस्थेला मुलांसाठी बेंच देण्यात आले.
• Covid-१९ काळात संपूर्ण लॉकडाऊन दरम्यान दररोज ४००० ते ५००० खिचडी पॅकेट वाटप करण्यात आले.
• भारतीय अन्न महामंडळाकडून सवलतीच्या दरात १५ टन तांदूळ आणि गहू खरेदी करून त्याचे मोफत वाटप करण्यात आले.
• लॅाकडाउन काळात रेल्वे गाड्या, मजूर, विद्यार्थी, पोलीस कर्मचारी यांना खिचडी पॅकेट वाटप करण्यात आले.
• धर्मादाय आयुक्तांच्या हस्ते अंध, अपंग, ऑटो रिक्षा चालक, मंदिरातील पुजारी आणि फेरीवाले यांसारख्या विविध क्षेत्रातील गरीब कुटुंबांसाठी लॅाकडाउन काळात अन्नधान्य किटचे वितरण करण्यात आले.
• चिपळूण पूरग्रस्तांना तांदूळ आणि धान्य वाटप करण्यात आले.
• १०-१५ मान्यताप्राप्त सामाजिक कार्य करणाऱ्या संस्थांना दरमहा मंदिरातील अतिरिक्त तांदूळ आणि साखरेचा पुरवठा करण्यात आला.
• पूर्वी फक्त सकाळ-संध्याकाळ खिचडी वाटप होत असे. भाविकांना अन्नदान आणि खिचडी-प्रसाद वाटप आता सकाळी ६ ते रात्री १० वाजेपर्यंत असे दिवसभर करण्यात येते. दर गुरुवारी सरासरी २५ ते ३० हजार भाविकांना खिचडीचा प्रसाद दिला जातो.
• भारती हॉस्पिटल आणि पुणे महापालिकेच्या कमला नेहरू हॉस्पिटलमध्ये दररोज ४०० फूड पॅकेट आणि सदाशिव पेठ पुणे येथील स्टडी सेंटरमधील विद्यार्थ्यांना ८५ फूड पॅकेट्स वितरित करण्यात येतात त्यासाठी ट्रस्टने स्वतःचे वाहन खरेदी केले आहे.
११ ) कोविड महामारी मधील देणगी स्वरुपात मदत.
• मुख्यमंत्री निधीत १० लाख रुपयांची देणगी स्वरुपात मदत
• एन-९५ मास्क खरेदी करण्यासाठी पुणे ससून जनरल हॉस्पिटलला ५ लाख रुपयांची देणगी स्वरुपात मदत
• कोविड प्रभावित गरीब विद्यार्थ्यांचे शैक्षणिक शुल्क भरण्यासाठी २ लाख रुपयांची देणगी स्वरुपात मदत.
• PMC च्या बाणेर कोविड सेंटरला २० लाख रुपयांचे पाच नवीन व्हेंटिलेटर खरेदी करून दिले.
१२) शंकर महाराज समाधीचे यंदा ७५ वे वर्ष असल्याने आजपर्यंत विविध विशेष उपक्रम राबविण्यात आले.
• आजपर्यंत प्रत्येक दुर्गाष्टमीला एक अशी १० रक्तदान शिबिरे आयोजित करून एकूण २२६६ रक्त पिशव्या संकलित केल्या आहेत. पुण्यातील धार्मिक संस्थेने केलेला रक्त संकलनाचा हा विक्रम आहे.
• PMC च्या पूर्वपरवानगीने तळजाई टेकडीवर ७५ झाडांचे रोपण करण्यात आले. तेथे दर आठवड्याला साफसफाई आणि देखभाल करण्यात येते. लागवड केलेल्या झाडांना पाणी देण्यासाठी तळजाई टेकडीवर दहा हजार लिटर पाण्याची टाकी बसवली.
• वर्षभर श्री शंकर महाराजांच्या तसेच त्यांच्या विविध शिष्यांच्या व्यक्तिचित्र स्वरूपातील रांगोळया काढून त्या प्रदर्शित करण्यात आल्या.
• ७५ व्या समाधी सोहळ्या निमित्त स्मरणिका प्रकाशन करण्यात आले.
• नवीन कलात्मक ध्वजस्तंभाचे बांधकाम करण्यात आले.
• स्वामींच्या नवीन मूर्तीची स्थापना करण्यात आली.