उत्सव

/उत्सव

वार्षिक उत्सव सदगुरु श्री शंकर महाराज समाधी सोहळ्या विषयी

 

दर वर्षी वैशाख शुद्ध प्रतिपदा ते वैशाख शुद्ध नवमी सदगुरु श्री शंकर महाराजांचा समाधी सोहळा साजरा करण्यात येतो. वैशाख शुद्ध प्रतिपदेस पहाटे चार वाजता, चौघड्याच्या निनादात, काकड आरतीने श्रीं च्या अभिषेकाने उत्सवास सुरवात होते. त्या नंतर वीणा पूजन करून अखंड नाम सप्ताहास सुरवात होते. समाधी उत्सवात रोज काकड आरती, लघुरुद्र, प्रवचन, कीर्तन, भजन, पारायण इ. अध्यात्मिक व धार्मिक कार्यक्रम करण्यात येतात. उत्सव काळात श्रीं चा मठ व दर्शन रात्रंदिवस अखंड चालू असते. अक्षय तृतीयेच्या दिवशी श्री अन्नपूर्णेचे पूजन करून उत्सवातील महाप्रसाद (बुंदी/कळी) तयार करण्यास सुरवात होते. महाराजांच्या समाधी दिनी म्हणजेच वैशाख शुद्ध अष्टमीस पहाटे २.३० वाजता श्रीं च्या अभिषेकास सुरवात होते. श्रीं ची आरती पहाटे ५.३० वाजता होऊन, महारुद्रास सुरवात होते. महारुद्र संपन्न झाल्यावर महाप्रसादास सुरवात होते जो रात्री उशीर पर्यंत चालू असतो. सायंकाळी ४ वाजता श्रीं चा पालखी सोहळा सुरु होतो व सायंकाळी ७.३० वाजता महाआरती संपन्न होते. त्या नंतर मठात श्री भवानीआईच्या जागरण गोंधळास सुरवात होते. अष्टमीच्या दुसऱ्या दिवशी सकाळी १० वाजता प्रक्षावळ पूजा, ध्वजारोहणानंतर काल्याच्या कीर्तनांस सुरवात होते. काल्याचे कीर्तना नंतर महाप्रसाद देण्यात येतो. हे सर्व कार्यक्रम संपन्न झाल्यावर उत्सवाची सांगता होते.

 

१. चैत्र शुक्ल प्रतिपदा : गुढी पडावा

२. चैत्र शुक्ल द्वितीया : श्री अक्कलकोट स्वामी प्रकट दिन

३.चैत्र शुक्ल पौर्णिमा : श्री हनुमान जयंती

४. चैत्र वद्य त्रयोदशी : श्री स्वामी समर्थ पुण्यतिथी

५. श्री शंकर महाराजांचा समाधी सोहळा : वैशाख शुक्ल ०१ ते वैशाख शुक्ल ०९

६. वैशाख शुक्ल द्वादशी :  चंदन उटी

६. ज्येष्ठ पौर्णिमा : वटपौर्णिमा

७. आषाढ शुक्ल एकादशी : (देवशयनी) आषाढी एकादशी

८.  आषाढ पौर्णिमा  : गुरुपौर्णिमा, श्री शंकर महाराजांचा पालखी सोहळा

९. १५ ऑगस्ट : स्वातंत्र्यदिन

१०. श्रावण मास : मठात संपूर्ण श्रावण मासात प्रवचन, कीर्तन व गुरुचरित्र, ज्ञानेश्वरी, दासबोध, ई. ग्रंथांचे पारायण करण्यात येते.

११. अश्विन शुक्ल १० : दसरा

१२. अश्विन शुक्ल १५ : कोजागिरी पौर्णिमा

१३. कार्तिक शुक्ल पौर्णिमा : दीपोत्सव

१४. मार्गशीर्ष शुक्ल पौर्णिमा : श्री दत्त जयंती पालखी सोहळा

१५. पौष शुक्ल चतुर्दशी : मकर संक्रांत (ध्वजारोहण)

१६. माघ कृष्ण चतुर्दशी – महाशिवरात्र

१७. फाल्गुन शुक्ल पौर्णिमा – होली पूजन (होळी)

दर महिन्याच्या शुक्ल पक्षातील अष्टमीस ‘दुर्गाष्टमीस’ सायं. ४ ते ६.४० या वेळेत पालखी सोहळा संपन्न होईल.