कलादालन

Home / कलादालन

परब्रम्ह प्रकटले भूवरी - श्री शंकर महाराज

नाशिक जिल्ह्यामध्ये सटाणा तालुक्यात अंतापूर नावाचे गाव. या गावात चिमणाजी आणि पार्वती नावाचे शिवभक्त दांपत्य रहात असे. त्यांना मुलबाळ नव्हते म्हणून ते मनोभावे शिव – आराधना करीत. एके दिवशी भगवान शंकराने चिमणाजीला  स्वप्नात येऊन दृष्टांत दिला ” दावलमलिकाजवळ मी आहे. मला घरी आण”. पार्वती आणि चिमणाजी त्या जागी जाऊन पाहतात तर ती वाघिणींच्या मधोमध एक बालक पहुडलेले दिसते. दोघेही घाबरतात चिमणाजीला भगवान शंकराने सांगितलेली गोष्ट आठवते, “त्या वाघिणींना भिऊ नकोस. मला घरी आण”. चिमणाजी धिटाईने पुढे होताच वाघिणी दूर होतात व चिमणाजी मुलाला घरी आणतो.

सोमवार, कार्तिक शुद्ध अष्टमीस प्रकटले श्री शंकर महाराज

संदर्भ – शंकरगीता अध्याय १, ओवी क्र. ६७ ते १०४, शंकर लीला पान क्र. १७ ते १८, भक्तांच्या अनुभूमीतून योगीराज श्री शंकर महाराज दर्शन पा. क्र. १८…

नाशिक जिल्ह्यामध्ये सटाणा तालुक्यात अंतापूर नावाचे गाव. या गावात चिमणाजी आणि पार्वती नावाचे शिवभक्त दांपत्य रहात असे. त्यांना मुलबाळ नव्हते म्हणून ते मनोभावे शिव – आराधना करीत. एके दिवशी भगवान शंकराने चिमणाजीला  स्वप्नात येऊन दृष्टांत दिला ” दावलमलिकाजवळ मी आहे.
मला घरी आण”. पार्वती आणि चिमणाजी त्या जागी जाऊन पाहतात तर ती वाघिणींच्या मधोमध एक बालक पहुडलेले दिसते. दोघेही घाबरतात चिमणाजीला भगवान शंकराने सांगितलेली गोष्ट आठवते, “त्या वाघिणींना भिऊ नकोस. मला घरी आण”. चिमणाजी धिटाईने पुढे होताच वाघिणी दूर होतात व चिमणाजी मुलाला घरी आणतो.

सोमवार, कार्तिक शुद्ध अष्टमीस प्रकटले श्री शंकर महाराज

संदर्भ – शंकरगीता अध्याय १, ओवी क्र. ६७ ते १०४, शंकर लीला पान क्र. १७ ते १८, भक्तांच्या अनुभूमीतून योगीराज श्री शंकर महाराज दर्शन पा. क्र. १८…

अतर्क्य, अद् भूत शंकरलीला !

त्र्यंबकेश्वरमध्ये श्री. रामभाऊ अकोलकर यांचेकडे महाराज मुक्कामी असताना एक दशग्रंथी ब्राह्मण दर्शनास आला. नमस्कार करून त्याने प्रसादाची याचना केली. महाराजांनी नकार दिला “तू खाणार नाहीस “तो ब्राह्मण म्हणाला” महाराज मी अवश्य ग्रहण करीन महाराजांनी कागदात बांधून प्रसाद दिला. ब्राह्मणाने आनंदाने तो घरी आणला व उघडून पाहतो तर काय ?  चार कोंबडीची अंडी ! शिव शिव शिव ! म्हणत ब्राह्मणाने तो प्रसाद उकिरड्यावर फेकून दिला.
रामभाऊंनी त्या ब्राह्मणास प्रसादाचे काय झाले विचारले. यावर त्याने तो प्रसाद उकिरड्यावर फेकल्याचे सांगितले व सोबत नेऊन समक्ष दाखविले. तिथे फेकलेल्या अंड्याच्या ठिकाणी आंबे पाहून सगळेच आश्चर्यचकित झाले.

।। जय शंकर ।।

संदर्भ – शंकर गीता अध्याय ४, ओवी क्र. २० ते ३२, भक्तांच्या अनुभूतीतून योगीराज श्री शंकर महाराज दर्शन पान क्र १०५ व १०६.

अतर्क्य, अद् भूत शंकरलीला !

त्र्यंबकेश्वरमध्ये श्री. रामभाऊ अकोलकर यांचेकडे महाराज मुक्कामी असताना एक दशग्रंथी ब्राह्मण दर्शनास आला. नमस्कार करून त्याने प्रसादाची याचना केली. महाराजांनी नकार दिला “तू खाणार नाहीस “तो ब्राह्मण म्हणाला” महाराज मी अवश्य ग्रहण करीन महाराजांनी कागदात बांधून प्रसाद दिला.
ब्राह्मणाने आनंदाने तो घरी आणला व उघडून पाहतो तर काय ?  चार कोंबडीची अंडी ! शिव शिव शिव ! म्हणत ब्राह्मणाने तो प्रसाद उकिरड्यावर फेकून दिला.
रामभाऊंनी त्या ब्राह्मणास प्रसादाचे काय झाले विचारले. यावर त्याने तो प्रसाद उकिरड्यावर फेकल्याचे सांगितले व सोबत नेऊन समक्ष दाखविले. तिथे फेकलेल्या अंड्याच्या ठिकाणी आंबे पाहून सगळेच आश्चर्यचकित झाले.

।। जय शंकर ।।

संदर्भ – शंकर गीता अध्याय ४, ओवी क्र. २० ते ३२, भक्तांच्या अनुभूतीतून योगीराज श्री शंकर महाराज दर्शन पान क्र १०५ व १०६.

नाद गर्जता "अल्लख निरंजन" धुनी पेटविली राखेमधून.

अहमदनगर जवळील श्री क्षेत्र मढी येथे नाथपंथी योगी कानिफनाथांची समाधी आहे. या समाधीच्या दर्शनासाठी श्री शंकर महाराज गेले असताना, दर्शन घेतल्यावर महाराज बाहेर आले. मंदिराच्या आवारात एक पुरातन निद्रिस्त धुनी होती. महाराज त्या धुनीजवळ गेले व त्यांनी ‘अल्लख निरंजन’ अशी गर्जना केली आणि आश्चर्य घडले ! त्या ध्वनीलहरींच्या प्रभावाने धुनी क्षणार्धात प्रज्वलित झाली. महाराज म्हणाले “ही धुनी आता अखंड चालू ठेवा… हा ज्ञानाग्नी निरंतर ज्वलंत राहू दे.”

।।जय शंकर ।।

संदर्भ – शंकरगीता अध्याय १३, ओवी क्र. १० ते १८, शंकरलीला पान क्र. ९४ ते ९७.

अहमदनगर जवळील श्री क्षेत्र मढी येथे नाथपंथी योगी कानिफनाथांची समाधी आहे. या समाधीच्या दर्शनासाठी श्री शंकर महाराज गेले असताना, दर्शन घेतल्यावर महाराज बाहेर आले. मंदिराच्या आवारात एक पुरातन निद्रिस्त धुनी होती.
महाराज त्या धुनीजवळ गेले व त्यांनी ‘अल्लख निरंजन’ अशी गर्जना केली आणि आश्चर्य घडले !
त्या ध्वनीलहरींच्या प्रभावाने धुनी क्षणार्धात प्रज्वलित झाली. महाराज म्हणाले “ही धुनी आता अखंड चालू ठेवा… हा ज्ञानाग्नी निरंतर ज्वलंत राहू दे.”

।।जय शंकर ।।

संदर्भ – शंकर गीता अध्याय ४, ओवी क्र ४३ ते ४५, भक्तांच्या अनुभूतीतून योगीराज श्री शंकर महाराज दर्शन पान क्र. १०६, शंकर लीला पान क्र. १८८.
संदर्भ – शंकरगीता अध्याय १३, ओवी क्र. १० ते १८, शंकरलीला पान क्र. ९४ ते ९७.

धाव घाली विठू आता, चालू नको मंद !

कार्तिकी एकादशीचा दिवस होता. रावसाहेब मेहेंदळेंच्या वाड्यावर ताईसाहेबांचे कीर्तन सुरू होते. यल्लुबाई त्यांना साथ करीत होत्या. कीर्तन श्रवण करण्यासाठी पांडुरंगबुवा बोद्रे यांच्या विनंतीवरून स्वरसम्राट बालगंधर्व ही उपस्थित होते. दोघीही अगदी तल्लीन होऊन अत्यंत तन्मयतेने विठ्ठल भक्तीची पदे आळवीत होत्या. बालगंधर्वही भान हरखून ऐकत होते.

 धाव घाली विठू आता चालू नको मंद… अभंग रंगात आलेला असतानाच श्री शंकर महाराजांचे वाड्यात आगमन झाले. महाराज स्थानापन्न झाल्यावर अभंग पुन्हा सुरू झाले. ते ऐकता ऐकता महाराज भक्तीरसात दंग होऊन उठून नाचू लागले वाद्यांची लय वाढत गेली महाराज स्व:तभोवती गिरक्या घेत नाचत राहिले. विठ्ठल नामाने भक्तीचा कळस गाठला आणि महाराजांच्या ठायी साक्षात पांडुरंगच दिसू लागला !

महाराजांनी सर्व भक्तांना साक्षात भगवंताचे दर्शन घडविले आणि बालगंधर्वांना आपल्या भेटीचे स्मरण करून दिले.

तो हा विठ्ठल बरवा, तो हा शंकर बरवा ।।

संदर्भ – शंकरगीता अध्याय ४, ओवी क्र. ५५ ते ५७, शंकरलीला पान क्र. १५१ ते १५४

धाव घाली विठू आता, चालू नको मंद !

कार्तिकी एकादशीचा दिवस होता. रावसाहेब मेहेंदळेंच्या वाड्यावर ताईसाहेबांचे कीर्तन सुरू होते. यल्लुबाई त्यांना साथ करीत होत्या. कीर्तन श्रवण करण्यासाठी पांडुरंगबुवा बोद्रे यांच्या विनंतीवरून स्वरसम्राट बालगंधर्व ही उपस्थित होते. दोघीही अगदी तल्लीन होऊन अत्यंत तन्मयतेने विठ्ठल
भक्तीची पदे आळवीत होत्या. बालगंधर्वही भान हरखून ऐकत होते.
 धाव घाली विठू आता चालू नको मंद… अभंग रंगात आलेला असतानाच श्री शंकर महाराजांचे वाड्यात आगमन झाले. महाराज स्थानापन्न झाल्यावर अभंग पुन्हा सुरू झाले. ते ऐकता ऐकता महाराज भक्तीरसात दंग होऊन उठून नाचू लागले वाद्यांची लय वाढत गेली महाराज स्व:तभोवती गिरक्या घेत नाचत राहिले. विठ्ठल नामाने भक्तीचा कळस गाठला आणि महाराजांच्या ठायी साक्षात पांडुरंगच दिसू लागला !
महाराजांनी सर्व भक्तांना साक्षात भगवंताचे दर्शन घडविले आणि बालगंधर्वांना आपल्या भेटीचे स्मरण करून दिले.

तो हा विठ्ठल बरवा, तो हा शंकर बरवा ।।

संदर्भ – शंकरगीता अध्याय ४, ओवी क्र. ५५ ते ५७, शंकरलीला पान क्र. १५१ ते १५४

नागास शंकराची ओळख पटली, शांतपणे त्याने वाट धरली...

एकदा श्री शंकर महाराज भक्तगणांसमवेत बसले असताना जवळपास खूप गडबड गोंधळ ऐकू आला. महाराजांनी आपल्या जवळच्या भक्ताला कसला गोंधळ चालू आहे हे पाहण्यासाठी पाठवले. थोड्याच वेळात तो भक्त धावत पळत आला आणि घाबरा घुबरा होऊन सांगू लागला, “एक भला मोठा नाग निघाला असून लोक त्याला मारण्याचा प्रयत्न करीत आहेत” महाराज ताबडतोब उठले. गर्दीच्या ठिकाणी आले लोकांनी नागाला डिवचल्याने तो रागाने बेभान झाला होता. महाराजांनी लोकांना बाजूला केले आणि काठीने मारू नका असे सांगितले.
महाराज हातात काहीही न घेता नागाच्या जवळ गेले. नागाने रागाने फुत्कार सोडत महाराजांच्या पायाला विळखा घातला आणि फणा उगारला. महाराजांनी नागाच्या फण्यावरून प्रेमाने हात फिरवला व त्याला उचलून हातात घेतले. सर्व माणसे आश्चर्याने बघतच राहिली. महाराजांनी दूरवर झाडीत नेऊन नागाला सोडले. तो शांतपणे कोणाला कसलाही त्रास न देता दूर निघून गेला. नागाला शंकराची ओळख पटली. शांतपणे त्याने आपली वाट धरली.

।। जय शंकर ।।

संदर्भ – शंकरगीता अध्याय ५, ओवी क्र ३ ते ८, भक्तांच्या अनुभूतीतून योगीराज शंकर महाराज दर्शन पान क्र. १०७, श्री शंकर महाराज अद् भुत चरित्र व अलौकिक उपदेश पान क्र. ४५.

एकदा श्री शंकर महाराज भक्तगणांसमवेत बसले असताना जवळपास खूप गडबड गोंधळ ऐकू आला. महाराजांनी आपल्या जवळच्या भक्ताला कसला गोंधळ चालू आहे हे पाहण्यासाठी पाठवले. थोड्याच वेळात तो भक्त धावत पळत आला आणि घाबरा घुबरा होऊन सांगू लागला, “एक भला मोठा नाग
निघाला असून लोक त्याला मारण्याचा प्रयत्न करीत आहेत” महाराज ताबडतोब उठले. गर्दीच्या ठिकाणी आले लोकांनी नागाला डिवचल्याने तो रागाने बेभान झाला होता. महाराजांनी लोकांना बाजूला केले आणि काठीने मारू नका असे सांगितले.
महाराज हातात काहीही न घेता नागाच्या जवळ गेले. नागाने रागाने फुत्कार सोडत महाराजांच्या पायाला विळखा घातला आणि फणा उगारला. महाराजांनी नागाच्या फण्यावरून प्रेमाने हात फिरवला व त्याला उचलून हातात घेतले. सर्व माणसे आश्चर्याने बघतच राहिली. महाराजांनी दूरवर झाडीत नेऊन नागाला सोडले. तो शांतपणे कोणाला कसलाही त्रास न देता दूर निघून गेला. नागाला शंकराची ओळख पटली. शांतपणे त्याने आपली वाट धरली.

।। जय शंकर ।।

संदर्भ – शंकरगीता अध्याय ५, ओवी क्र ३ ते ८, भक्तांच्या अनुभूतीतून योगीराज शंकर महाराज दर्शन पान क्र. १०७, श्री शंकर महाराज अद् भुत चरित्र व अलौकिक उपदेश पान क्र. ४५.

शिवलिंग प्रगटले वृद्धेश्वरी, गुरु गहिनी भेटले मध्यरात्री.

श्री शंकर महाराज आपल्या निवडक भक्तांसोबत नगरहून पाथर्डीकडे जात असताना वाटेत वृद्धेश्वरला थांबले. त्यांनी अल्लख म्हणत जमिनीवर जोरात थाप मारली आणी म्हणाले “इथे खणा” माणसं खणायला लागणार तोच धरणी दुभंगली आणि जमिनीतून स्वयंभू शिवलिंग प्रगटले. “हिच्यावर देऊळ बांधा” एवढे बोलून महाराज परत फिरले. तिथे देऊळ बांधले गेले आणि महाराजांच्या नावावरून नाव पडले “शंकरेश्वर”.

पुढे नाशिकला गेल्यावर त्र्यंबकेश्वरला जाऊन गुरु गहिनीनाथांचा समाधिचे दर्शन घ्यावे असा भक्तांचा विचार होता त्यावर “आज रात्री श्री गहिनीनाथांनाच तिकडे बोलावतो ” असे महाराजांनी भक्तांना सांगितले आणि त्यांना एक दिव्य अनुभूती दिली.

अलख निरंजन !

संदर्भ – शंकरगीता अध्याय ५, ओवी क्र २५ ते २८, श्री शंकर महाराज अद् भूत चरित्र व अलौकिक उपदेश पान क्र १४८, शंकरलीला पान क्र. १८८.

श्री शंकर महाराज आपल्या निवडक भक्तांसोबत नगरहून पाथर्डीकडे जात असताना वाटेत वृद्धेश्वरला थांबले. त्यांनी अल्लख म्हणत जमिनीवर जोरात थाप मारली आणी म्हणाले “इथे खणा” माणसं खणायला लागणार तोच धरणी दुभंगली आणि जमिनीतून स्वयंभू शिवलिंग प्रगटले.
“हिच्यावर देऊळ बांधा” एवढे बोलून महाराज परत फिरले. तिथे देऊळ बांधले गेले आणि महाराजांच्या नावावरून नाव पडले “शंकरेश्वर”.
पुढे नाशिकला गेल्यावर त्र्यंबकेश्वरला जाऊन गुरु गहिनीनाथांचा समाधिचे दर्शन घ्यावे असा भक्तांचा विचार होता त्यावर “आज रात्री श्री गहिनीनाथांनाच तिकडे बोलावतो ” असे महाराजांनी भक्तांना सांगितले आणि त्यांना एक दिव्य अनुभूती दिली.

अलख निरंजन !

संदर्भ – शंकरगीता अध्याय ५, ओवी क्र २५ ते २८, श्री शंकर महाराज अद् भूत चरित्र व अलौकिक उपदेश पान क्र १४८, शंकरलीला पान क्र. १८८.

अजि मी ब्रम्ह पाहिले !

ब्रिटिशकालीन गव्हर्नर सर चुनीलाल मेहता आणि त्यांच्या पत्नी पुण्यामध्ये श्री. मामा ढेकणे यांच्या घरी श्री शंकर महाराजांच्या दर्शनासाठी आले होते.
महाराजांनी त्यांना भगवान श्री विष्णूरुपात दर्शन दिले ! शंकर आणि विष्णू दोघांना पाहून भक्त हरखून गेले.

जय शंकर !

संदर्भ – शंकरगीता अध्याय ५, ओवी क्र. ५९ ते ७५, शंकरलीला पान क्र. १३३ ते १३५.

त्रिगुणात्मक शक्तीची प्रचिती ...!

श्री शंकर महाराज अहमदनगर येथे मुक्कामी असताना श्री. गणेशपंत अभ्यंकर यांचा मुलगा चि. दत्तात्रय यास गिरनार पर्वतावर भगवान दत्तात्रेयाच्या दर्शनासाठी घेऊन गेले. नऊ – दहा वर्षाचा दत्तात्रय एवढा मोठा पर्वत चढणार तरी कसा ? महाराजांनी त्याला उचलून खांद्यावर घेतले आणि थोड्याच वेळात दहा हजार पायऱ्या चढून पर्वत शिखरावर पोहोचले. श्री गुरुदत्त पादुकांचे दर्शन घेतल्यानंतर त्यांनी साधु – संतासाठी भोजनाची तयारी सुरू केली. दुसऱ्या दिवशी त्यांनी “अल्लख निरंजन” अशी गर्जना करून तसेच शंखनाद करून असंख्य साधु – संत, महात्म्यांना गिरनार क्षेत्री भोजनास आमंत्रित केले आणि सर्वांना यथेच्छ भोजन देऊन आकंठ तृप्त केले.

श्री गुरुदेव दत्त ।।

संदर्भ – शंकरगीता अध्याय ६, ओवी क्र. ८० ते १०७, शंकरलीला पान क्र. १३० ते १३१.

त्रिगुणात्मक शक्तीची प्रचिती ...!

श्री शंकर महाराज अहमदनगर येथे मुक्कामी असताना श्री. गणेशपंत अभ्यंकर यांचा मुलगा चि. दत्तात्रय यास गिरनार पर्वतावर भगवान दत्तात्रेयाच्या दर्शनासाठी घेऊन गेले. नऊ – दहा वर्षाचा दत्तात्रय एवढा मोठा पर्वत चढणार तरी कसा ? महाराजांनी त्याला उचलून खांद्यावर घेतले आणि थोड्याच वेळात दहा हजार पायऱ्या चढून पर्वत शिखरावर पोहोचले.
श्री गुरुदत्त पादुकांचे दर्शन घेतल्यानंतर त्यांनी साधु – संतासाठी भोजनाची तयारी सुरू केली. दुसऱ्या दिवशी त्यांनी “अल्लख निरंजन” अशी गर्जना करून तसेच शंखनाद करून असंख्य साधु – संत, महात्म्यांना गिरनार क्षेत्री भोजनास आमंत्रित केले आणि सर्वांना यथेच्छ भोजन देऊन आकंठ तृप्त केले.

श्री गुरुदेव दत्त ।।

संदर्भ – शंकरगीता अध्याय ६, ओवी क्र. ८० ते १०७, शंकरलीला पान क्र. १३० ते १३१.

अहिंसा परमो धर्म :

श्री शंकर महाराज कलकत्ता येथे असताना एका श्रीमंत भक्ताने त्यांना आपल्या घरी नेले. हे गृहस्थ एक कत्तलखाना चालवित असत. त्यांना घरी आल्यावर महाराजांचे आतिथ्य मोठ्या भक्तिभावाने, विनम्रतेने आणि आदराने केले. थोड्यावेळाने महाराजांसाठी भोजन वाढून आणण्यासाठी पती – पत्नी दोघेही स्वयंपाक घरात गेले.
ते परत यायच्या आत श्री शंकर महाराजांनी खंडयोगाचा प्रयोग करून आपल्या शरीराचे सर्व अवयव धडावेगळे करून घरामध्ये इरस्ततः विखरविले. भक्त पती – पत्नी भोजनाचे ताट घेऊन बाहेर आले आणि त्यांनी हे चित्र पाहिले. हातातील ताट गळून पडले आणि मूर्च्छित होऊन जमिनीवर कोसळले. महाराजांनी त्यांच्या चेहऱ्यावर पाणी शिंपडून त्यांना शुद्धीवर आणले, सावरले त्यांनी डोळे उघडले आणि पहातात तो काय ? समोर महाराज उभे. भक्त महाराजांना म्हणाला महाराज तुम्ही कोणाला अशा अवस्थेत दर्शन देऊ नका खूप वाईट वाटते यावर महाराजांनी त्याला प्रतिप्रश्न केला. तुम्ही दररोज हजारो निष्पाप प्राणीमात्रांची कत्तल करता त्यांचे जीव घेता तेव्हा तुम्हाला वाईट वाटत नाही का ? एवढे बोलून महाराज निघून गेले.
भक्त अंतर्मुख झाला त्याने कत्तलखाना बंद केला आणि अहिंसेचे महत्त्व जाणून नवा व्यवसाय सुरु केला.

पुण्य पर उपकार पाप ते परपीडा ।

संदर्भ – शंकरगीता अध्याय ७, ओवी क्र. ५६ ते ६७, भक्तांच्या अनुभूतीतून योगीराज श्री शंकर महाराज दर्शन पान क्र. ११३.

बाबा गेले.... बाबा आले !

श्री शंकर महाराजांचे थोर भक्त श्री. जी. के. प्रधान लंडनमध्ये असताना इकडे भारतात त्यांच्या वडिलांचे देहावसान झाले. ही बातमी समजताच ते पितृशोकाने व्यथित, विमनस्क अन् दुःखमग्न झाले. अशा अवस्थेत ते एकाकी बसले असताना श्री शंकर बाबा तिथे अवतरले… बाबांनी प्रधानाचे सांत्वन केले आणि त्यांना घेऊन गिरनार पर्वतावर आले. तिथे प्रधानांना बाबांनी श्री दत्तप्रभू, श्री मच्छिंद्रनाथ आणि श्री गोरक्षनाथांचे दर्शन घडविले. त्यांचा दुःखभार हलका झाल्यावर श्री शंकर बाबांनी त्यांना पुन्हा लंडनच्या घरी नेऊन सोडले. सकाळी घरच्या मालकिणीने श्री प्रधानांच्या बुटांना लागलेली लाल माती पाहून त्यांना विचारले, काल रात्री आपण कोठे गेला होतात ? ही माती लंडनची नसून भारतातली आहे.

अलख निरंजन !

संदर्भ – शंकरगीता अध्याय ९, ओवी क्र. ८२ ते ८५, भक्तांच्या अनुभूतीतून योगीराज शंकर महाराज दर्शन पान क्र. ६२, शंकरलीला पान क्र. ३०१ ते ३०३….

बाबा गेले.... बाबा आले !

श्री शंकर महाराजांचे थोर भक्त श्री. जी. के. प्रधान लंडनमध्ये असताना इकडे भारतात त्यांच्या वडिलांचे देहावसान झाले. ही बातमी समजताच ते पितृशोकाने व्यथित, विमनस्क अन् दुःखमग्न झाले. अशा अवस्थेत ते एकाकी बसले असताना श्री शंकर बाबा तिथे अवतरले… बाबांनी प्रधानाचे सांत्वन केले आणि
त्यांना घेऊन गिरनार पर्वतावर आले. तिथे प्रधानांना बाबांनी श्री दत्तप्रभू, श्री मच्छिंद्रनाथ आणि श्री गोरक्षनाथांचे दर्शन घडविले. त्यांचा दुःखभार हलका झाल्यावर श्री शंकर बाबांनी त्यांना पुन्हा लंडनच्या घरी नेऊन सोडले. सकाळी घरच्या मालकिणीने श्री प्रधानांच्या बुटांना लागलेली लाल माती पाहून त्यांना विचारले, काल रात्री आपण कोठे गेला होतात ? ही माती लंडनची नसून भारतातली आहे.

अलख निरंजन !

संदर्भ – शंकरगीता अध्याय ९, ओवी क्र. ८२ ते ८५, भक्तांच्या अनुभूतीतून योगीराज शंकर महाराज दर्शन पान क्र. ६२, शंकरलीला पान क्र. ३०१ ते ३०३….

प्रसादाची खीर पावन झाली, मेलेली चिमणी दूर उडाली !

सोलापूर येथील जक्कल मळ्यामध्ये श्री स्वामी समर्थांच्या पुण्यतिथी उत्सवाची तयारी सुरू होती. महाप्रसादासाठी एका झाडाखाली मोठ्या कढईत खीर शिजविली जात होती. अचानक एक चिमणी खिरीच्या कढईत पडून मेली. अशा या खिरीचा नैवेद्य स्वामींना कसा दाखवायचा ?  अशा चिंतेत मंडळी बसली होती.
  
श्री शंकर महाराजांच्या कानावर ही बातमी पोहोचली. महाराज तेथे आले व त्यांनी कढईत हात घालून ती मेलेली चिमणी काढली तिच्या पाठीवरून प्रेमाने हात फिरविला आणि आश्चर्य घडले. ती चिमणी जिवंत झाली व भुर्रर्रदिशी उडून गेली.

।। श्री स्वामी समर्थ ।।

संदर्भ – शंकरगीता अध्याय ११, ओवी क्र. ७१ ते ७७, भक्तांच्या अनुभूतीतून योगीराज शंकर महाराज दर्शन पान क्र. १२२.

शुभराय मठात श्री जनार्दन स्वामी, अनुग्रह पावता तोषले मनी.

विठ्ठल भक्त जनार्दन बुवांना साक्षात पांडुरंगाने स्वप्नात येऊन दृष्टांत दिला “स्वतः शिवशंकर इथे येऊन तुला अनुग्रह देणार आहेत” जनुकाका अत्यंत उत्कटतेने असे केव्हा घडेल त्याची मनोमन प्रतीक्षा करत होते. एके दिवशी जनुकाका विठ्ठल भजनात तल्लीन झालेले असताना अचानक ‘अल्लख निरंजन’ अशी गर्जना त्यांच्या कानी पडली. दारात साक्षात श्री शंकर महाराज उभे होते. जनुकाका अपार भक्तीभावाने त्यांच्याकडे पहातच राहिले. त्यांना महाराज दिसलेच नाहीत. त्याजागी एकमुखी दत्ताचे दर्शन झाले. महाराजांनी त्यांना हाताला धरून क्षणार्धात कुरवपूरला नेले. तिथे त्यांना श्रीपाद श्रीवल्लभ स्वामींचे दर्शन घडविले आणि त्यांच्याकडून जनुकाकांना तारक मंत्राचा उपदेश करविला.

दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा ।

विठ्ठल भक्त जनार्दन बुवांना साक्षात पांडुरंगाने स्वप्नात येऊन दृष्टांत दिला “स्वतः शिवशंकर इथे येऊन तुला अनुग्रह देणार आहेत” जनुकाका अत्यंत उत्कटतेने असे केव्हा घडेल त्याची मनोमन प्रतीक्षा करत होते. एके दिवशी जनुकाका विठ्ठल भजनात तल्लीन झालेले असताना अचानक ‘अल्लख निरंजन’
अशी गर्जना त्यांच्या कानी पडली. दारात साक्षात श्री शंकर महाराज उभे होते. जनुकाका अपार भक्तीभावाने त्यांच्याकडे पहातच राहिले. त्यांना महाराज दिसलेच नाहीत. त्याजागी एकमुखी दत्ताचे दर्शन झाले. महाराजांनी त्यांना हाताला धरून क्षणार्धात कुरवपूरला नेले. तिथे त्यांना श्रीपाद श्रीवल्लभ स्वामींचे दर्शन घडविले आणि त्यांच्याकडून जनुकाकांना तारक मंत्राचा उपदेश करविला.

दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा ।

हैदराबाद चा निजाम शरण आला, नदीची ओटी भरता पूर ओसरला !

हैदराबादचा निजाम पहिला महाराजांना मानित असे. पण निजाम दुसरा त्यांना जाणित नसे. एकदा महाराज त्याच्या दरबारात गेले असता त्याने महाराजांचा अपमान करून आपला दिवाण सालारजंग याचे करवी हाकलून दिले. जाताना महाराजांनी दिवाणास सांगितले की तुझा राजा मला त्याच्या सिंहासनावर बसवेल बघशील तू. महाराज तिथून निघून गेले. त्यानंतर काहीवेळातच ढग दाटून आले सोसाट्याचा वारा सुटला मेघागर्जना होऊन पाऊस कोसळू लागला संततधार पावसाने सारा मुलूख पाण्यात बुडला निजाम चिंतेत पडला दिवाणाने त्यास सांगितले की खाविंद आपण महाराजांचा अपमान केलात म्हणूनच आपल्या मुलूखावर हे आसमानी संकट कोसळले आहे. आपण त्यांना शरण जा. त्यांची माफी मागा तेच या संकटातून आपल्याला वाचवतील. निजामाला आपली चूक उमगली त्याने महाराजांना शोधून सन्मानपूर्वक दरबारात आणले आपल्या सिंहासनावर बसविले हात जोडून त्यांची माफी मागितली आणि उपाय विचारला. महाराज म्हणाले जा खणानारळाने नदीची ओटी भरा. निजामाने त्याप्रमाणे केले व संकट टळले. पूर ओसरला आणि राज्य वाचले ! महाराजांनी निजामाला त्याची पूर्वजन्मीची ओळख करून देत सांगितले अरे मागच्या जन्मीचा रजक धोबी तू, मीच तुला राजा केला.

जय शंकर ।

संदर्भ – शंकरगीता अध्याय १३, ओवी क्र. ८४ ते ९०, भक्तांच्या अनुभूतीतून योगीराज श्री शंकर महाराज दर्शन पान क्र. १२४.

हैदराबादचा निजाम पहिला महाराजांना मानित असे. पण निजाम दुसरा त्यांना जाणित नसे. एकदा महाराज त्याच्या दरबारात गेले असता त्याने महाराजांचा अपमान करून आपला दिवाण सालारजंग याचे करवी हाकलून दिले. जाताना महाराजांनी दिवाणास सांगितले की तुझा राजा मला त्याच्या सिंहासनावर बसवेल बघशील तू. महाराज
तिथून निघून गेले. त्यानंतर काहीवेळातच ढग दाटून आले सोसाट्याचा वारा सुटला मेघागर्जना होऊन पाऊस कोसळू लागला संततधार पावसाने सारा मुलूख पाण्यात बुडला निजाम चिंतेत पडला दिवाणाने त्यास सांगितले की खाविंद आपण महाराजांचा अपमान केलात म्हणूनच आपल्या मुलूखावर हे आसमानी संकट कोसळले आहे. आपण त्यांना शरण जा. त्यांची माफी मागा तेच या संकटातून आपल्याला वाचवतील. निजामाला आपली चूक उमगली त्याने महाराजांना शोधून सन्मानपूर्वक दरबारात आणले आपल्या सिंहासनावर बसविले हात जोडून त्यांची माफी मागितली आणि उपाय विचारला. महाराज म्हणाले जा खणानारळाने नदीची ओटी भरा. निजामाने त्याप्रमाणे केले व संकट टळले. पूर ओसरला आणि राज्य वाचले ! महाराजांनी निजामाला त्याची पूर्वजन्मीची ओळख करून देत सांगितले अरे मागच्या जन्मीचा रजक धोबी तू, मीच तुला राजा केला.

जय शंकर ।

संदर्भ – शंकरगीता अध्याय १३, ओवी क्र. ८४ ते ९०, भक्तांच्या अनुभूतीतून योगीराज श्री शंकर महाराज दर्शन पान क्र. १२४.

सरस्वतीच्या मुखी बोलले, वेद ब्राम्हणा तुम्ही शिकविले !

एकदा श्री शंकर महाराज काशी विश्वेश्वराच्या दर्शनास गेले असताना काशीच्या वैदिक ब्राम्हणांनी त्यांची कुचेष्टा केली. ते महाराजांना म्हणाले “तुम्ही कसले महाराज ? तुमच्याकडे ना वैदिक विचार, ना आचार. वेदांचे महत्त्व तुम्हांस मुळी ठाऊकच नाही”. महाराजांनी त्यांचे म्हणणे शांतपणाने ऐकून घेतले. जवळच एक मुलगी सागरगोटे खेळत बसली होती. त्यांनी तिला जवळ बोलावले आणि ब्राम्हणांना वेद समजावून देण्यास सांगितले. महाराजांच्या कृपेने ती लहान मुलगी व्यासमुनींप्रमाणे बोलू लागली. वेदांचे ज्ञान ब्राम्हणांना देऊ लागली. हा चमत्कार पाहून ब्राह्मणांनी महाराजांच्या चरणावर मस्तक ठेवले.

शिव हर शंकर । नमामि शंकर ।।

संदर्भ – शंकरगीता अध्याय १५, ओवी क्र. ४४ ते ५०.

एकदा श्री शंकर महाराज काशी विश्वेश्वराच्या दर्शनास गेले असताना काशीच्या वैदिक ब्राम्हणांनी त्यांची कुचेष्टा केली. ते महाराजांना म्हणाले “तुम्ही कसले महाराज ? तुमच्याकडे ना वैदिक विचार, ना आचार. वेदांचे महत्त्व तुम्हांस मुळी ठाऊकच नाही”.
महाराजांनी त्यांचे म्हणणे शांतपणाने ऐकून घेतले.
जवळच एक मुलगी सागरगोटे खेळत बसली होती. त्यांनी तिला जवळ बोलावले आणि ब्राम्हणांना वेद समजावून देण्यास सांगितले. महाराजांच्या कृपेने ती लहान मुलगी व्यासमुनींप्रमाणे बोलू लागली. वेदांचे ज्ञान ब्राम्हणांना देऊ लागली. हा चमत्कार पाहून ब्राह्मणांनी महाराजांच्या चरणावर मस्तक ठेवले.

शिव हर शंकर । नमामि शंकर ।।

संदर्भ – शंकरगीता अध्याय १५, ओवी क्र. ४४ ते ५०.

काशीच्या सावकराची कन्या कुमारी, रूपाबेन झाली धार संस्थानची राणी !

वारणसीचा एक धनाढ्य सावकार श्री शंकर महाराजांचा निस्सिम भक्त होता. महाराज त्याच्याकडे गेले असता त्यांनी सावकाराकडे एक विचित्र मागणी केली. तुझी कन्या रूपाबेन मला दे ! माझ्याशी तिचे लग्न लावून दे. सावकार गोंधळून गेला. महाराजांच्या भक्तीपोटी त्याने होकार दिला. पत्नीची समजूत काढली अन् लग्नाची तयारी सुरू केली. योग्य मुहूर्त पाहून काशीविश्वेश्वराच्या मंदिरात विवाह सोहळा आयोजित केला. लग्नाला अवघा गाव लोटला. सात वर्षाची चिमुरडी रूपाबेन आणि बागुलबुवासारखे दिसणारे महाराज बोहल्यावर चढले. लोकांनी सावकाराची टिंगल टवाळी केली. लग्नाचा मुहूर्त जवळ आला मंगलाष्टके संपली आंतरपाट दूर झाला आणि सात वर्षाची रूपाबेन आपले दोन्ही हात उंचावून महाराजांच्या गळ्यात वरमाला घालणार तोच महाराजांनी तिचे पाय धरले तिच्या पायावर आपले मस्तक ठेवित ते म्हणाले जगदंब जगदंब ! देवी कन्याकुमारी तुला वंदन असो, नमस्तस्ये नमस्तस्ये नमस्तस्ये नमो नमः

सावकाराला काहीच समजेना तो आणि रूपाबेन दोघेही महाराजांच्या पाया पडले. त्यांना उठवित महाराज म्हणाले जगदंब जगदंब तुझ्या कन्येचे वैधव्य टळले ! आता ती राजाची राणी होईल. पुढे रूपाबेनला धार संस्थानच्या राजघराण्यातून लग्नाची मागणी आली आणि सावकराची कन्या रूपाबेन धार संस्थानची राणी झाली.

शंकर कृपेने विघ्न टळले, सावकाराचे पुण्य फळा आले !

संदर्भ – शंकरगीता अध्याय १५, ओवी क्र. ६६ ते ७४, शंकरलीला पान क्र. २६४ ते २६६

वारणसीचा एक धनाढ्य सावकार श्री शंकर महाराजांचा निस्सिम भक्त होता. महाराज त्याच्याकडे गेले असता त्यांनी सावकाराकडे एक विचित्र मागणी केली. तुझी कन्या रूपाबेन मला दे ! माझ्याशी तिचे लग्न लावून दे. सावकार गोंधळून गेला. महाराजांच्या भक्तीपोटी त्याने होकार दिला. पत्नीची
समजूत काढली अन् लग्नाची तयारी सुरू केली. योग्य मुहूर्त पाहून काशीविश्वेश्वराच्या मंदिरात विवाह सोहळा आयोजित केला. लग्नाला अवघा गाव लोटला. सात वर्षाची चिमुरडी रूपाबेन आणि बागुलबुवासारखे दिसणारे महाराज बोहल्यावर चढले. लोकांनी सावकाराची टिंगल टवाळी केली. लग्नाचा मुहूर्त जवळ आला मंगलाष्टके संपली आंतरपाट दूर झाला आणि सात वर्षाची रूपाबेन आपले दोन्ही हात उंचावून महाराजांच्या गळ्यात वरमाला घालणार तोच महाराजांनी तिचे पाय धरले तिच्या पायावर आपले मस्तक ठेवित ते म्हणाले जगदंब जगदंब ! देवी कन्याकुमारी तुला वंदन असो, नमस्तस्ये नमस्तस्ये नमस्तस्ये नमो नमः
सावकाराला काहीच समजेना तो आणि रूपाबेन दोघेही महाराजांच्या पाया पडले. त्यांना उठवित महाराज म्हणाले जगदंब जगदंब तुझ्या कन्येचे वैधव्य टळले ! आता ती राजाची राणी होईल. पुढे रूपाबेनला धार संस्थानच्या राजघराण्यातून लग्नाची मागणी आली आणि सावकराची कन्या रूपाबेन धार संस्थानची राणी झाली.

शंकर कृपेने विघ्न टळले, सावकाराचे पुण्य फळा आले !

संदर्भ – शंकरगीता अध्याय १५, ओवी क्र. ६६ ते ७४, शंकरलीला पान क्र. २६४ ते २६६

गहिनीनाथांचे मंदिर बांधले, साखर कारखान्याचे बांधकाम निर्विघ्न झाले !

अकलूजजवळ माळीनगर येथे एका सहकारी साखर कारखान्याचे बांधकाम सुरू होते. या बांधकामामध्ये नाना तऱ्हेची विघ्न येऊन बांधकाम वारंवार खंडित होत होते. एकदा कारखान्याचे काही संचालक श्री शंकर महाराजांच्या दर्शनासास आले असताना त्यांनी महाराजांना याबाबत विचारले असे सारखे सारखे का घडते ? यावर उपाय सांगा .
महाराज म्हणाले बॉयलर पाडा, त्याखाली श्री गहिनीनाथांच्या पादुका आहेत. त्याप्रमाणे बॉयलर पाडून खोदकाम केले असता तिथे श्री गहिनीनाथांच्या पादुका मिळाल्या. महाराजांनी त्यांची विधिवत स्थापना करून पूजा केली अन् सांगितले इथे देऊळ बांधा, त्याप्रमाणे तिथे देऊळ बांधले आणि साखर कारखान्याचे बांधकाम निर्विघ्नपणे पार पडले ! आजही या ठिकाणी नाथांचे मंदिर आहे आणि पादुकांची नित्य पूजा केली जाते.

अल्लख निरंजन !

संदर्भ – शंकरगीता अध्याय १५, ओवी क्र. ७५ ते ७६, भक्तांच्या अनुभूतीतून योगीराज श्री शंकर महाराज दर्शन पान क्र. १०२.

अचलावरही ज्याची सत्ता, तो शिवशंकर विश्वनियंता !

महाराजांचे निस्सिम भक्त श्री मधुकर त्रिंबक जोशी उर्फ बाबदेव यांनी प्रत्यक्ष अनुभवलेला आणि स्वःतच्या मुखाने कथन केलेला हा अद् भूत प्रसंग आहे.

महाराज एकदा वृद्धेश्वरला गेले होते.  त्यांच्यासोबत डॉ. धनेश्वर, जहागीरदार मिरीकर आदि भक्त होते. महाराज गावाजवळच्या डोंगराजवळ जाऊन बसले, मी इथे आहे रे मला न्या असे सांगू लागले. महाराजांना ग्रामस्थांनी गावात परत आणले. त्यावेळी गावात दुष्काळ पडला होता आणि एके ठिकाणी विहीर खोदण्याचे काम चालू होते. काम चालू असताना एक पहार जमिनीत रुतून बसली ती काही केल्या निघेचना. काही मंडळी श्री शंकर महाराजांकडे धावत गेली आणि पहार जमिनीत रुतून बसल्याचे सांगितले. त्यावर महाराज म्हणाले “चल मी काढतो, चल मी काढतो”. असे म्हणत घाई घाईने उठून ते लोकांसोबत विहिरीजवळ आले. महाराजांनी पहारीला हात लावला आणि म्हणाले ” चल, ये वर “अस म्हणताच ती निर्जीव पहार आपोआप वर आली. ही ज्ञानवापी नावाची विहीर आणि पहारीचा चमत्कार आजही त्यांच्या चांगला स्मरणात आहे.

महाराज एकदा वृद्धेश्वरला गेले होते.  त्यांच्यासोबत डॉ. धनेश्वर, जहागीरदार मिरीकर आदि भक्त होते. महाराज गावाजवळच्या डोंगराजवळ जाऊन बसले,
मी इथे आहे रे मला न्या असे सांगू लागले. महाराजांना ग्रामस्थांनी गावात परत आणले. त्यावेळी गावात दुष्काळ पडला होता आणि एके ठिकाणी विहीर खोदण्याचे काम चालू होते. काम चालू असताना एक पहार जमिनीत रुतून बसली ती काही केल्या निघेचना. काही मंडळी श्री शंकर महाराजांकडे धावत गेली आणि पहार जमिनीत रुतून बसल्याचे सांगितले. त्यावर महाराज म्हणाले “चल मी काढतो, चल मी काढतो”. असे म्हणत घाई घाईने उठून ते लोकांसोबत विहिरीजवळ आले. महाराजांनी पहारीला हात लावला आणि म्हणाले ” चल, ये वर “अस म्हणताच ती निर्जीव पहार आपोआप वर आली. ही ज्ञानवापी नावाची विहीर आणि पहारीचा चमत्कार आजही त्यांच्या चांगला स्मरणात आहे.

जय शंकर ।

मस्त फकीर का कौन ठिकाना, मै तो दुनिया घुमा ।

श्री शंकर महाराज विश्वव्यापी, विश्वसंचारी सिद्धयोगी होते. सोलापूरच्या शुभराय मठामध्ये अनंताचार्य उंब्रजकर नावाचे गरीब ब्राम्हण राहत होते. त्यांच्या मनीची इच्छा ओळखून एकदा महाराजांनी त्यांना आपल्यासोबत मुंबईला नेले नंतर महाराज त्यांना घेऊन परदेश भ्रमणाला निघाले. मस्कत, बगदाद, इंग्लंड, फ्रान्स, इराक, इटली, युरोप, अरब अमीराती अशी अनेक ठिकाणे त्यांना दाखवली. प्रवासामध्ये महाराज जिथे जिथे जात तिथे लोक त्यांना ओळखत होते. त्यांच्याशी अत्यंत आदराने वागत होते. नवल म्हणजे महाराजसुद्धा सर्वांशी त्यांच्या त्यांच्या भाषेत बोलत होते. कुणी त्यांना नुर महंमद म्हणे तर कुणी जॉनसाहेब स्टीमबाबा म्हणून हाका मारीत असत जितके देश जितकी गांव, तितकी नावं पण महाराज मात्र एकच !

 श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वरचे क्षेत्र उपाध्ये राजाभाऊ यांनाही महाराजांनी अशाच प्रकारे भारत दर्शन घडविले. हिमालय पर्वत, बद्री – केदारनाथ, गंगाद्वार, हरिद्वार, ऋषिकेश, काशीविश्वेश्वर, जगन्नाथपुरी, द्वारका, सोमनाथ नंतर कुरवपूर आणि दक्षिणेकडे कन्याकुमारी रामेश्वर अशा सर्व तीर्थक्षेत्रांच दर्शन घडवून आरतीच्या वेळी त्यांना आपल्या क्षेत्रस्थानी, त्र्यंबकेश्वरी परत आणून सोडले…

परमात्मा विश्वसंचारी, श्री शंकर भक्तकैवारी ।

संदर्भ – शंकरगीता अध्याय १६, ओवी क्र. २ ते १०, शंकरलीला पान क्र. २३६ ते २३९

श्री शंकर महाराज विश्वव्यापी, विश्वसंचारी सिद्धयोगी होते. सोलापूरच्या शुभराय मठामध्ये अनंताचार्य उंब्रजकर नावाचे गरीब ब्राम्हण राहत होते. त्यांच्या मनीची इच्छा ओळखून एकदा महाराजांनी त्यांना आपल्यासोबत मुंबईला नेले नंतर महाराज त्यांना घेऊन परदेश भ्रमणाला निघाले. मस्कत, बगदाद, इंग्लंड, फ्रान्स, इराक, इटली, युरोप, अरब अमीराती अशी अनेक ठिकाणे त्यांना दाखवली.
प्रवासामध्ये महाराज जिथे जिथे जात तिथे लोक त्यांना ओळखत होते. त्यांच्याशी अत्यंत आदराने वागत होते. नवल म्हणजे महाराजसुद्धा सर्वांशी त्यांच्या त्यांच्या भाषेत बोलत होते. कुणी त्यांना नुर महंमद म्हणे तर कुणी जॉनसाहेब स्टीमबाबा म्हणून हाका मारीत असत जितके देश जितकी गांव, तितकी नावं पण महाराज मात्र एकच !