देणगी

/देणगी

श्री सद्गुरू संतवर्य योगीराज शंकरमहाराज समाधी ट्रस्ट, पुणे (रजिस्टर नं. ७९३)

पुणेसातारा रोड, धनकवडी पुणे ४११ ०४३

 

भारतातील बँक ऑफ इंडियाच्या कोणत्याही शाखेत आपण रोख अथवा चेकने खालिल खाते नं. व वरील प्रमाणे संस्थेचे नाव टाकून, देणगी बँकेत जमा करू शकता. म्हणजे बँकेमार्फत संस्थेस देणगी प्राप्त होईल.

नाव – श्री सद्गुरू संतवर्य योगीराज शंकरमहाराज समाधी ट्रस्ट

बॅंक – बँक ऑफ इंडिया

खाते क्रमांक – 050510110007533

शाखा – लक्ष्मी रोड पुणे

IFSC कोड – BKID0000505

 

अधिक माहितीसाठी संपर्क : +91 8830079596 / 9765361444 / 9823933691 / 9766316755

 

आरती

१) एकदा बुक केलेली आरती कुठल्याही कारणास्तव रद्द होणार नाही.

२) एका वेळी एकच आरती बुक करता येईल तसेच आरती बुक करता येईल तसेच आरती बुकिंग पुढील १५ दिवसांपर्यंतचे मिळेल.

३) आरती वेळी घरातील फक्त पाच व्यक्तींना गाभाऱ्यात आरतीसाठी प्रवेश दिला जाईल.

४) काही अपरिहार्य कारणास्तव आरती बुकिंग रद्द करण्याचा अधिकार विश्वस्तांना आहे. अश्यावेळी संबंधित भक्तास पुढील उपलब्ध तारीख देण्यात येईल.

५) दुर्गाष्टमी, गुरुपौर्णिमा, दत्तजयंती, वार्षिक उत्सव व काही ठराविक दिवस सोडून इतर दिवसांच्या सर्व आरत्यांचे बुकिंग करता येईल.

६) ज्या भक्ताच्या नावे आरतीची पावती होईल त्याच व्यक्तीच्या हस्ते आरती करता येईल.

७) आरतीचा जप चालू होण्यापूर्वी ऑफिसमध्येयेवून भेटावे व आयकार्ड घेणे बंधनकारक आहे.

सदर सेवेचे देणगी मूल्य रु. १,५००/-

 

अन्नदान

१) मठात सकाळ, दुपार व संध्याकाळच्या आरती नंतर द्रोणातून प्रसाद वाटप केले जाते. प्रसादामध्ये भाताची खिचडी, शिरा, लापशी इ.चा समावेश असतो.

२) साधारण एका वेळेस १,००० ते १,५०० द्रोणातून भक्तांस अन्नदान प्रसाद वाटप केले जाते.

३) भक्तांच्या सोईच्या तारखेनुसार बुकिंग करून स्वहस्ते प्रसाद वाटप करता येते.

सदर सेवेचे देणगी मूल्य रु. १,५००/-

 

महाप्रसाद

१) दर सोमवार व गुरुवार दुपारी १२.०० च्या आरती नंतर दुपारी २.०० पर्यंत वाटप केले जाते.

२) सोमवारी व गुरुवारी साधारणपणे ८०० ते १००० भक्त प्रसादाचा लाभ घेतात, याकरिता अंदाजे रु. ५०,००० पर्यंत खर्च येतो.

३) दर दुर्गाष्टमी ला संध्या. ०६.०० ते १०.३० पर्यंत वाटप केले जाते.

४) साधारणपणे ८,००० ते १०,००० भक्त प्रसादाचा लाभ घेतात, याकरिता अंदाजे ३ ते ४ लाखापर्यंत खर्च येतो.

५) या सेवेसाठी देणगी देणाऱ्या भक्तांची नावे महाप्रसादाच्या दालनात फळ्यावर लिहिली जातात.

सदर सेवेचे देणगी मूल्य रु. ५,०००/- पासून पुढे.

 

दुर्गाष्टमी

१) प्रत्येक महिन्याच्या दुर्गाष्टमीस (वैशाख अष्टमी सोडून) दुपारी श्रींच्या पादुकांची पूजा, पालखी सोहळा आणि सायं आरतीचा मान अष्टमी बुक करणाऱ्या भक्ताला (यजमान) दिला जातो.

२) यजमानांच्या हस्ते पालखी सोहळा व आरती झाल्यावर श्रीफळ व प्रसाद दिला जातो.

सदर सेवेचे देणगी मूल्य रु. ३१,०००/-

 

पुजा यज्ञ-याग

१) भक्तांनी ठरवलेल्या दिवशी सकाळी ७.०० च्या आरती नंतर पुजा सुरु केली जाते.

२) यजमानांच्या हस्ते पूजा झाल्यावर श्रीफळ व प्रसाद दिला जातो.

३) एकदा बुक केलेली पुजा कुठल्याही कारणास्तव रद्द करता येणार नाही.

४) पुजेच्यावेळी यजमान व घरातील फक्त पाच व्यक्तींना उपस्थित राहता येईल.

५) काही अपरिहार्य कारणास्तव पुजेचे बुकिंग रद्द करण्याचा अधिकार विश्वस्तांना आहे. अश्यावेळी संबंधित भक्तास पुढील उपलब्ध तारीख देण्यात येईल.

सदर सेवांचे देणगी मूल्य खालीलप्रमाणे –

लघुरुद्र रु. ४,५००/-, संक्षिप्त याग रु. ११,०००/-, रुद्रस्वाहाकार – रु. २५,०००/-, गणेशयाग – रु. २५,०००/-, दत्त याग – रु. २५,०००/-, विष्णुयाग – रु. २५,०००/-, सौर याग – रु. २५,०००/-, महारुद्र – रु. ३५,०००/-, नवचंडी याग – रु. ४५,०००/-, शतचंडी याग – संपुट – रु. १,००,०००/-

 

फेटा

भक्तांनी ठरवलेल्या दिवशी सकाळी स्नानानंतर श्री महाराजांस पोशाखाच्या रंगानुसार फेटा घातला जातो.

सदर सेवेचे देणगी मूल्य रु. ३,०००/-

 

पोशाख

भक्तांनी ठरवलेल्या दिवशी सकाळी स्नानानंतर श्री महाराजांस पोशाख घातला जातो. श्रींचा वापरलेला एक पोशाख प्रसाद भेट दिला जातो.

सदर सेवेचे देणगी मूल्य रु. ११,०००/-

श्रींच्या पोशाखासाठी देणगी मूल्य स्वीकारले जाते. गुणवत्ता व सुसूत्रता राखण्यासाठी भक्तांनी दिलेले कोणतेही कापड किंवा पोशाख श्रींना घातला जात नाही. ट्रस्टतर्फे पोशाखाचे कापड खरेदी करून अधिकृत टेलर कडूनच श्रींचा पोशाख शिवून घेतला जातो. या आधी श्रीना वापरलेले पोशाखाचे समुद्रात विसर्जन करण्यात येत होते पण आता जे भक्त पोशाखासाठी पावती करतील त्या भक्तांना श्रींचा वापरलेला पोशाख प्रसाद स्वरुपात देण्याचे ठरविले आहे. त्याचबरोबर सदर पोशाखाचे पावित्र्य जतन करावे असे आवाहन केले आहे.