विश्वस्तांची नेमणूक

Home / संस्थेचे सेवाकार्य

श्री सद्गुरू संतवर्य योगीराज शंकर महाराज समाधी ट्रस्टच्या योजनेतील तरतुदीनुसार विश्वस्त मंडळ निवड करण्याची पध्दत

२. धर्मादाय दवाखाना:

संस्थेतर्फे धर्मार्थ दवाखाना मोफत चालवला जातो. त्यासाठी संस्थेतर्फे मानधन देवून डॉक्टरांची नेमणूक केली जाते. काही सेवाभावी डॉक्टरांची विनामोबदला मदत घेतली जाते. सदर आरोग्य केंद्रात तपासणी करून मोफत ओषधे दिली जातात. त्याच बरोबर मोफत आरोग्य तपासणी शिबीर, रक्तदान शिबीर, नेत्र तपासणी शिबीर इत्यादी कार्यक्रम राबवले जातात.

४. रक्तदान शिबीर

मठाच्या वतीने दरवर्षी रक्तदान शिबीर भरवण्यात येते.
श्री सद्गुरू संतवर्य योगीराज शंकर महाराज समाधी ट्रस्ट हा नोंदणीकृत न्यास असून न्यासाचा नोंदणी क्र. ए-७९३ असा आहे. न्यासाच्या योजनेमध्ये विश्वस्तांची यादी (पॅनल) हे विश्वस्तपदाचा तीन वर्षाचा कार्यकाळ संपण्यापूर्वी तीन महिने आधी मा. सहाय्यक धर्मादाय आयुक्त कार्यालयाकडे दाखल करण्याची तरतूद आहे.
श्री पन्नालाल बाळकृष्ण मालपाणी यांच्या कुटुंबातील एक सदस्य घेऊन विद्यमान विश्वस्तांनी एकूण दहा सुयोग्य व्यक्तींची नावे मा. सहाय्यक धर्मादाय आयुक्त कार्यालयाकडे विहित नमुन्यात सादर करायची असून विद्यमान विश्वस्त देखील पुन्हा निवडीसाठी आपली नावे देऊ शकतात. यामुळे मठ व ट्रस्टशी संलग्न असणारे भक्त, सेवेकरी, हितचिंतक तसेच येथील परंपरा व पद्धती माहिती असणाऱ्या सेवाधारी व्यक्ती या विश्वस्त पदासाठी पात्र उमेदवार ठरतील. येथे गुरू, शिष्य व गादी परंपरा नाही. येथे फक्त सेवेची परंपरा आहे.
न्यासाचा कारभार हा योग्य व्यक्तींच्या हातात असावा. सदर व्यक्ती महाराजांच्या भक्त असाव्यात. विश्वस्तांनी सुरु केलेली कार्ये पुढे चालवणाऱ्या, संस्थेला मदत करणाऱ्या, संस्थेच्या प्रगतीस हातभार लावणाऱ्या व सेवाभाव असणाऱ्या व्यक्तींची विश्वस्तपदी नियुक्ती व्हावी म्हणून विद्यमान विश्वस्त मंडळाने निवडलेल्या दहा व्यक्तींच्या यादीतूनच सात पात्र व्यक्तींची निवड सक्षम अधिकाऱ्याने (मा. सहाय्यक धर्मादाय आयुक्त, पुणे) करावी, जेणेकरून विश्वस्त मंडळ तयार होताना त्यात जुन्या अनुभवी व नवीन उत्साही व्यक्तींची निवड होऊन समतोल साधला जाईल. तसेच एक विचाराने संस्थेचे कार्य चालविले जाईल.
प्रत्येक मंदिरात त्या देवाची सत्ता असते, तिथे चालणाऱ्या सर्वच गोष्टींकडे त्या देवतेचे लक्ष असते. मठात घडणाऱ्या घटना किंवा बदल महाराजांच्या मान्यते शिवाय होत नाहीत. न्यासाची स्थापना करताना २८.११.१९७० साली जी परिपूर्ण योजना महाराजांच्या प्रेरणेने तयार करण्यात आली होती तिचा आदर करावा व त्यानुसार संस्थेचे कार्य चालविण्यात यावे. न्यासाच्या परंपरेस तडा जाईल अशा प्रकारचे कोणतेही निर्णय विश्वस्त मंडळाने घेवू नयेत असे ठरले आहे.