श्रींचे चरित्र

/श्रींचे चरित्र

श्री सदगुरू शंकर महाराज यांचे अल्प चरित्र

आपल्या भारतवर्षाचे भाग्य थोर म्हणून या सिद्ध भूमीत आजवर अनेक ईश्वरतुल्य संत, सत्पुरुषांनी जन्म घेतला. त्याच परंपरेतील श्री सद्गुरू शंकर महाराज हे एक सिद्ध आणि अवलिया सत्पुरुष होते.

अवधूत ह्या शब्दाची व्याख्या विचारात घेतली तर आपणास मनोमन पटते कि श्री शंकर महाराज अवधूतच होते. अशा अवधुतांच्या तीन अवस्था सांगितल्या आहेत. बाल अवस्था, उन्मनी अवस्था आणि पिशाच्च अवस्था. ह्या तीनही अवस्थांमध्ये आपल अवतारकार्य संपन्न करणारे असे योगीराज म्हणजे सदगुरु श्री सद्गुरू शंकर महाराज. मैं कैलास का रहनेवाला I मेरा नाम है शंकर II असे त्यांनी स्व:मुखे आपल्या मूळस्थान व नाव आपल्याला सांगितले आहे. श्री शंकर महाराज नाथपंथीय होते, अवतार कार्यात ह्याची प्रचीती त्यांनी आपल्या भक्तांस पदोपदी दिली होती.

श्री शंकर महाराज……! एक अलौकिक, सिद्ध, महान योगी. त्यांचे व्यक्तिमत्वही गूढ, अनाकलनीय. त्यामुळे त्यांच्यासंबंधी विविधरंगी आख्यायिका ऐकावयास मिळतात. श्री शंकर महाराज यांचा जन्म कधी व कोठे झाला? त्यांचे गाव कोठले? मातापिता कोण? इत्यादी पुर्ववृताची विश्वसनीय व सुसंगत माहिती उपलब्ध नाही.