संस्थेचे सेवाकार्य

/संस्थेचे सेवाकार्य

ठळक मुद्दे – ऑनलाईन पूजा, अभिषेक, मुख्यमंत्री सहाय्यता निधीला मदत, गरजूंना महाअन्नदान

पुणे धनकवडी येथील सद्गुरू शंकर महाराज मठ म्हणजे देशाविदेशातील लाखो शंकर महाराज भक्तांचे अढळ श्रद्धास्थान आहे. श्री सदगुरू संतवर्य शंकर महाराज समाधी ट्रस्टच्या वतीने दरवर्षी एप्रिल, मे दरम्यान साजरा केला जाणारा सद्गुरू शंकर महाराज समाधी सोहळा म्हणजे भक्तांसाठी मोठ्या आनंदाची पर्वणी असते.

यंदा मठातर्फे सद्गुरू शंकर महाराजांचा ७३ वा समाधी सोहोळा २४ एप्रिल ते २ मे दरम्यान मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार होता. परंतु कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव व लॉकडाऊन लक्षात घेऊन समाधी ट्रस्टच्या वतीने हा सोहळा अभिनव पद्धतीने साजरा करण्यात आल्यामुळे तो सर्वत्र चर्चेचा व कौतुकाचा विषय ठरला.

श्री सदगुरू संतवर्य शंकर महाराज समाधी ट्रस्टच्या वतीने मुख्यमंत्री सहायता निधी (कोविड-१९) या निधीस रू १० लाखांचे अर्थ साहाय्य करण्यात आले. तसेच ससून हॉस्पीटल देणगी समितीस आौषधे व साधन सामुग्री करीता रू ५ लाख देण्यात आले.

शासनाच्या आदेशानुसार श्री शंकर महाराज समाधी मंदिर (मठ), ७३ व्या समाधी सोहळ्याच्या काळात सुद्धा बंद ठेवण्यात आले. पोलीस प्रशासनाने दिलेल्या सुचनांचे मठाच्या विश्वस्तांनी काटेकोरपणे पालन केले. इतकेच नव्हे तर सर्वसामान्य भक्तांसोबतच महापौर, आमदार, नगरसेवक, पोलीस व प्रशासकीय अधिकारी अशा पदाधिकारी भक्तांनी देखील शंकर महाराजांचे दर्शन, मठाच्या दरवाजा बाहेरूनच घेऊन विश्वस्तांना सहकार्य केले. तसेच दर्शनासाठी दरवाजा उघडावा, म्हणून मठाच्या सिक्युरिटी कर्मचाऱ्यांना कोणताही त्रास दिला नाही.

दर्शनासाठी मठाच्या दारात आलेला भक्त उपाशी राहता कामा नये, अशी शंकर महाराजांची ईच्छा असल्याने मठातर्फे दररोज खिचडीचा प्रसाद आणि सोहळ्या दरम्यान मोठ्या प्रमाणावर अन्नदान केले जाते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा ७३ व्या समाधी सोहळ्यानिमित्त विद्यार्थी, बेरोजगार मजुर, गरीब कुटुंबे अशा हजारो वंचितांना खिचडीच्या प्रसादचे वाटप करण्यात आले. यावेळी अनेक भक्तांनी अन्नदानासाठी ऑनलाईन देणग्या देऊन आर्थिक साहय्य केलं.

भक्तांना समाधी सोहळा सप्ताहात दर्शनाचा लाभ घेता यावा म्हणून विश्वस्तांकडून अभिनव पद्धतीचा अवलंब करण्यात आला. फेसबुक व व्हॅट्सअपवर दररोजच्या पुजेचे तसेच मठाच्या परिसरातील फोटो आणि व्हिडीओ अपलोड करण्यात आले. त्यामुळे समाधी मंदिर बंद असले, तरीही भक्तांना निर्विघ्नपणे शंकर महाराजांचे दर्शन घेणे शक्य झाले. त्यामुळे जणू महाराज आपल्या सोबत आहेत, याची प्रचीती भक्तांना आली.

यावेळी मठातील धार्मिक विधी व पारंपारीक शोडषोपचार, प्रतिकात्मक रीतीने पार पाडण्यात आले. यावेळी सर्व सेवेकरी व कर्मचार्यांनी पुजा साहित्य उपलब्ध करून देण्यासाठी खूप मेहनत घेतली. उल्लेखनीय गोष्ट म्हणजे इंटरनेटसारख्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने ११ गुरुजींनी घरूनच रुद्र पठण करुन लघुरुद्र अभिषेक केला व आधुनिक संकल्पना स्विकारण्यात मठ, मंदिरेही मागे नाहीत हे दाखवून दिले. भक्तांनी आपापल्या घरी महाराजांची पूजा, नैवेद्य, पारायण, भजन करून हा सोहळा साजरा केला आणि त्याचे फोटो व्हिडीओ अपलोड केले.

अशाप्रकारे सामाजिक भान ठेवून सोहळा पार पाडण्यास सहकार्य केल्याबद्दल विश्वस्तांनी सर्व भक्तांचे आभार मानले. तसेच कोरोनाचे संकट लवकरात लवकर दूर होऊन भक्तांना श्रींच्या समाधीचे दर्शन घडावे, अशी सद्गुरु शंकर महाराज चरणी प्रार्थना केली.

करोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन संपेपर्यंत मठात शिधा, देणगी स्विकारण्यात येणार नसल्याने भक्तांनी समाधी परिसरात येवू नये; पोलीस, सिक्युरिटी, व्यवस्थापन कर्मचारी यांना सहकार्य करावे, असे आवाहन श्री सदगुरू संतवर्य योगीराज शंकर महाराज समाधी ट्रस्ट, पुणे च्या विश्वस्तांनी केले आहे. या वेळी अध्यक्ष भगवान खेडेकर , सचिव सुरेंद्र वाईकर, विश्वस्त चंद्रकांत मालपाणी, सुरेश येनपुरे, सदानंद खामकर, नागराज नायडू, प्रताप भोसले उपस्थित होते. Read more

 

धर्मादाय सहआयुक्तांनी पश्चिम महाराष्ट्रातील पूरग्रस्तांना मदत करण्याच्या आवाहनास प्रतिसाद देऊन मठा तर्फे १०,००० कीलो तांदुळ व १,००० कीलो साखर विधान भवन कार्यालयात जमा करत आहोत. विश्वस्त सदगुरू संतवर्य शंकर महाराज समाधी ट्रस्ट

 

श्री शंकर महाराज समाधी मठाच्या वतीने राबवण्यात येणारे सामाजिक उपक्रम

. पूर्व प्रार्थमिक शाळा: मठातील शाळेत शिशु वर्ग भरवण्यात येतात. येथे गरजू विद्यार्थ्यांस मोफत शिक्षण देण्यात येते. त्याच प्रमाणे सर्व विद्यार्थ्यांस मठा तर्फे मध्यान भोजन देण्यात येते. सर्व विद्यार्थ्यांस शालेय शिक्षण साहित्य विनामोबदला देण्यात येते. ह्या विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासा करीता सांस्कृतिक, शैक्षणिक व क्रीडा स्पर्धा आयोजित करण्यात येतात.

. धर्मादाय दवाखाना: मठातील दवाखान्यत बाह्य रुग्ण विभाग चालविण्यात येतो. येथे रोज निरनिराळ्या क्षेत्रातील नामवंत डॉक्टर्स गरजवंतांची मोफत वैद्यकीय तपासणी करून औषधे देतात.

. आरोग्य तपासणी शिबीर: मठाच्या वतीने वर्षातून वेळोवेळी आरोग्यतपासणी शिबीर, नेत्र तपासणी शिबीर, ई. आयोजित करण्यात येतात. ह्या शिबिरांच्या माध्यमातून गरजुंचे रोगनिदान करून पुढील उपचारांन करीता मार्गदर्शन करण्यात येते. नेत्र तपासणी द्वारे चाश्म्यांचे नंबर ठरवून मोफत चाश्म्यांचे वाटप करण्यात येते.

. रक्तदान शिबीर: मठाच्या वतीने दरवर्षी रक्तदान शिबीर भरवण्यात येते.

 

श्री सदगुरू संतवर्य योगीराज शंकर महाराज यांचा ७३ वा समाधी सोहळा लाँकडाउनमुळे अन्नदान करुन साजरा करण्यात आला.

कोरोनाच्या संकटाचा फैलाव रोखण्यासाठी राज्यातील मंदिरं भक्तांसाठी बंद करण्यात आली. सर्वच मोठी देवस्थानं बंद झाली आहेत. शासनाच्या आदेशानुसार पुण्याचं लाखो भक्तांचे श्रद्धा स्थान असणारे श्री शंकर महाराज समाधी मंदिर (मठ) ७३ वा समाधी सोहळ्यात सुद्धा बंद ठेवण्यात आले. विश्वस्तांनी पोलीस प्रशासनाने दिलेल्या सुचनांचे काटेकोरपणे पालन केले. आजपर्यंत सर्वसामान्य भक्तांसोबतच महापौर, आमदार, नगरसेवक, प्रशासकीय अधिकारी, पोलीस अशा महाराजांच्या मोठ्या पदाधिकारी भक्तांनी देखील मठाचे दरवाजा बाहेरून दर्शन घेऊन विश्वस्तांना सहकार्य केले. कोणीही दर्शनासाठी दरवाजा उघडण्यास मठाच्या सिक्युरिटी कर्मचाऱ्यांना त्रास दिला नाही.

दरवर्षी उत्सवात मठामधे येणाऱ्या भक्तांना महाराजांच्या खिचडीचा प्रसाद मिळतोच. मोठ्या प्रमाणावर अन्नदान केले जाते. भक्त कधीच भुकेला राहता कामा नये हीच महराजांची इच्छा असते. लाॅकडाऊन मधे आलेला ७३ वा समाधी सोहळा देखील जास्तीत जास्त विद्यार्थी, बेरोजगार मजुर, गरीब कुटुंब अशा वंचितांना खिचडीचा प्रसाद वाटून साजरा करण्यात आला. अनेक भक्तांनी अन्नदानासाठी ॲानलाईन देणग्या देऊन आर्थिक साहय्य केलं.

भक्तांना समाधी सोहळा सप्ताहात दर्शनाचा लाभ घेता यावा म्हणून विश्वस्तांकडून फेसबुक व वाँट्सपवर दररोजच्या पुजेचे तसेच मठाच्या परिसरातील फोटो, व्हिडीओ अपलोड करण्यात आले. त्यामुळे समाधी मंदिर बंद असले तरीही बाबा आपल्या सोबत आहेत व महाराजांचे अस्तित्व चराचरात आहे याची प्रचीतीच भक्तांना आली. धार्मिक विधी व पारंपारीक शोडषोपचार प्रतिकात्मक रीतीने पार पाडण्यात आले. पुजा साहित्य उपलब्ध करून देण्यासाठी सर्व सेवेकरी, कर्मचारी यांनी खूप मेहनत घेतली.
टेक्नॉंलॉजी च्या मदतीने ११ गुरुजींनी घरूनच रुद्र पठण करुन लघुरुद्र अभिषेक केला व एक नवीन संकल्पना स्विकारुन मठ मंदिरेही मागे नाहीत हे दाखवून दिले. प्रत्येकाने घरोघरी महाराजांची पुजा, नैवेद्य, पारायण, भजन करून हा सोहळा साजरा केला त्याचे फोटो व्हिडीओ अपलोड केले. भावनांपेक्षा व्यापक समाजहित पहाणे महत्त्वाचे आहे हे दाखवून दिले.

सामाजिक भान ठेवून सोहळा पार पाडण्यास सहकार्य केल्याबद्दल सर्व भक्तांचे विश्वस्तांनी आभार मानले व हे संकट लवकरात लवकर दूर होऊन भक्तांना श्रींच्या समाधीचे दर्शन घडावे अशी सद्गुरु चरणी प्रार्थना केली. करोना संसर्गामुळे लाँकडाउन संपेपर्यंत अन्नदानासाठी मठात शिधा, देणगी स्विकारता येणार नाही त्यामुळे समाधी परिसरांत येवू नये, पोलीस, सिक्युरिटी, व्यवस्थापन कर्मचारी यांना सहकार्य करावे असे आवाहन विश्वस्तांनी केले आहे.