मठाविषयी
Home / मठाविषयी
पहाटेचा अभिषेक
रोज पहाटे ०४:३० वाजता गाभारा उघडला जातो. शंख वाजवून स्नानास/अभिषेकास प्रारंभ होतो. गणपती, स्वामी-पादुका, समाधी वरील पादुका, जनु काका यांच्या पादुका, समाधी वरील चांदीच्या पोकळ पादुका यांना एक तांब्या पाणी घालून औक्षण केले जाते. तसेच समाधी वरील पादुका समाधी व श्रींना (मूर्तीला) कपाळी आणि चरणाला चंदन लावून, ओवाळून औक्षण केले जाते. त्यानंतर पाणी घालून मूर्ती व समाधी स्वच्छ केली जाते. मुर्ती पुसुन वस्त्र (टाँवेल) गुंडाळून ठेवून इतर उपचार समाधी वर केले जातात.
श्रींच्या मूर्तीला दूध, अत्तर, पंचामृत, उटणे वापरणे बंद केले असून, फक्त पाणी वापरले जाते. मूर्तीची झीज होऊ नये यासाठी पुरातत्व विभागाचे सुचनेनुसार असा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच स्नानाचे वेळी पुजारी किंवा ट्रस्टी यांच्या खेरीज इतर सेवेकरी अथवा भक्तांनी मुर्तीला कोणतेही उपचार करु नये असे ठरवले आहे.

समाधी वरील चंदन धुवून निघाले की, दूध उटणे इत्यादिं नि समाधीला स्नान घातले जाते. एक बादली गुलाबपाणी व केशरपाणी घालून श्रींच्या स्नाना ची सांगता होते. नंतर समाधी स्वच्छ पुसून फक्त समाधीला अत्तर लावले जाते व नंतर चंदन लेपन होऊन. जनु काका आणि स्वामी ह्यांच्या पादुका पुन्हा चौरंगा वर स्थानापन्न करण्यात येतात. ह्यानंतर तुळशी, बेल, दवणा, सुवासिक फुले इत्यादी अर्पण करून. श्रींच्या गळ्यात रुद्राक्ष माळ घातली जाते, जानवे घातले जाते व छडी समाधीवर ठेवली जाते.
त्यांनतर गंधलावून श्रींना पोशाख परिधान केला जातो. पोशाख परिधान करते वेळी, “सिद्धांत अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त, श्री स्वामी समर्थ महाराज की जय, अनंतकोटी ब्रह्मांडनायक राजाधिराज योगीराज श्री सद्गुरू शंकरबाबा महाराज की जय” असा जय जयकार केला जातो. अभिषेकच्या वेळी जप व रुद्र म्हणला जातो.