दिनक्रम

Home / दिनक्रम

मठाची वेळ पहाटे ०४:०० ते रात्री ११:००

श्रींच्या गाभाऱ्याची वेळ : पहाटे ०४:३० ते दुपारी ०१:०० व दुपारी ३:३० ते रात्री १०:३०
पहाटे ०४:०० वाजता मठाचे मुख्य प्रवेश द्वार व ०४:३० वाजता श्रींचा गाभारा उघडला जातो.
 
श्रींचा अभिषेक व नित्य पूजा : सकाळी ५.४५ पर्यंत संपन्न होते.
गुरुवार, दुर्गाष्टमी व सणाचे दिवशी गाभारा दुपारी पूर्ण वेळ उघडा असतो.
 
गाभारा व सभामंड़प बंद :
दुपारी १ ते ३.३० दरम्यान श्रींची विश्रांतीची वेळ असल्यामुळे गाभारा व सभामंड़प बंद ठेवला जातो, तसेच दुर्गाष्टमी व इतर मोठे सणा दिवशी गाभारा दर्शनासाठी खुला असतो. दुपारी २ ते ३.०० दरम्यान समाधी सजावट, साफसफाई यासाठी कर्मचारी व सेवेकरी गाभाऱ्यात असतात.
श्रीं च्या नैवेद्या ची वेळ : दररोज सकाळी अभिषेकाचे नंतर ५:३० ते ५:४५ दरम्यान व दुपारी ०३:०० ते ३:१५ दरम्यान श्रींना चहा व सिगारेट चा नैवेद्य दाखवला जातो. या वेळी दर्शन थांबवले जाते. तसेच दररोज दुपारी ११:३० व सायं ०६:०० वाजता श्रींना महानैवेद्य होतो. त्रिकाल आरती नंतर द्रोणात प्रसाद (अन्नदान) वाटला जातो तसेच दर सोमवार व गुरुवार दुपारी १२ ते २ या वेळात महाप्रसाद सुरु करण्यात आला आहे.
 
धूप : दररोज सकाळी व संध्याकाळी आरती पूर्वी वातावरण शुद्धी साठी संपूर्ण मठात धूप फिरवला जातो.
 
त्रिकाळ आरती : सकाळी ०७:००, दुपारी १२:०० आणि सायं ०६:३०
(रोज आरतीच्या आधी १५ मिनिटे श्री स्वामी समर्थ असा नाम जप केला जातो व शंख नादाने आरतीची सुरुवात होते.) आरती संस्थेचे कर्मचारी (पुजारी) करतात.
 
शेज पूजा : रात्री १० च्या सुमारास शेजघर, समाधी व गाभारा स्वच्छ करून श्रींचा पोशाख बदलला जातो. त्यानंतर शेजवस्त्र (मूर्तीला लोकरीची कानटोपी, मूर्ती व समाधीवर गरम शाल) परिधान केली जाते. महाराजांच्या नावाचा जय जयकार करून गाभारा १०:३० वाजता बंद होतो.
 
भजन : दर सोमवार व गुरुवार भजन सेवा रात्री ०८:३० ते १०:०० तसेच ट्रस्टचे नैमित्तिक कार्यक्रम असल्यास कार्यक्रमानंतर भजन सेवा होते.
 
किर्तन : दर एकादशीस संप्रदायिक (वारकरी) कीर्तन व द्वादशी दिवशी नारदीय कीर्तन संध्याकाळी ७:१५ ते ९:१५ या वेळात संपन्न होते. दर दुर्गाष्टमीस व उत्सवात आठ दिवस पहाटे ५ ते ६.४५ सांप्रदायिक (वारकरी) काकड आरती भजन होते.
मठाचे कार्यालयाची वेळ : रोज सकाळी ७.०० ते रात्री १०.३० वाजे पर्यंत.
 
आरती क्रम व नियमावली
१) श्लोक :- ब्रह्मा नंदम…
२) श्लोक :- गुरुब्रम्हां…
३) गणपतीची आरती :- सुखकर्ता दुखहर्ता…
४) देवीची आरती :- दुर्गे दुर्गट भारी…
५) शंकराची आरती :- लवथवती विक्राळा…
६) विठ्ठलाची आरती :- युगे आठठाविस उभा…
७) ज्ञानेश्वर माऊली आरती :- आरती ज्ञानराजा महा…
८) तुकाराम महाराज आरती :- आरती तुकारामा स्वामी…
९) दत्त महाराजांची आरती :- त्रिगुणात्मक त्रैमूर्ती…
१०) स्वामींची आरती :- जय देव जय देव दत्ता अवधुता…
११) महाराजांची आरती :- आरती श्री शंकर गुरूंची…(जनुकाका)
१२) महाराजांची आरती :- जय देव श्रीगुरू शंकर महाराजां…(सोनावणे मास्तर)
१३) महाराजांची आरती :- अज्ञानतमे गिळीले ज्ञान तेजाला…(नानासाहेब मिरीकर)
१४) मारुतीची आरती :- सत्राणे उडाणे…
१५) कापूर आरती :- कापुराची वात प्रभू…
१६) प्रार्थाना :- घालीन लोटांगण…
१७) श्लोक :- मंत्रपुष्पांजली…
१८) श्लोक :- सदा सर्वदा…
१९) श्लोक :- ज्या ज्या स्थळी…
२०) श्लोक :- उपासनेला दृढ चालवावे…
२१) श्लोक :- जयजयकार

 

।। सिद्धांत अवधूत चिंतन श्रीगुरु देव दत्त ।। श्री स्वामी समर्थ महाराज कि जय ।।
।। अनंतकोटी ब्रम्हाण्डनायक राजाधिराज योगीराज श्री सद्गुरू शंकरबाबा महाराज कि जय ।।
 
मठात त्रिकाळ आरती होते. सकाळी ०७:०० दुपारी १२:०० संध्याकाळी ०६:३०