देणगी

Home / देणगी

मठात देणगी स्वीकारण्याची पद्धत

गेल्या तीन वर्षापूर्वी पासून आपल्या मठात देणगीसाठी संगणक प्रणाली म्हणजेच COMPUTERISED इको फ्रेंडली देणगी पद्धत सुरु केली आहे. त्यात  मुख्यतः पेपरलेस सिस्टीम  (कमीतकमी कागदाचा वापर ) करण्यावर भर देऊन E – RECEIPT तयार केली आहे. यात देणगी देणाऱ्या भक्ताला मठातील कॉम्पुटर मध्ये असणाऱ्या सोफ्टवेअर द्वारे पावती केल्यावर इंटरनेट मार्फत पावती नंबर व दिलेल्या रकमेचा टेक्स्ट मेसेज भक्ताने दिलेल्या मोबाईल नंबर वर जातो व काऊटरवर दर्शनी भागात असलेल्या स्क्रीनवर पावती दाखवली जाते. ज्या भक्तांना पावती ची प्रिंट हवी असते अश्या भक्तांना पावतीची प्रिंट दिली जाते. सदर पेपरलेस सिस्टीमला अनेक भक्तांनी चांगला प्रतिसाद दिला असून ती आजपर्यंत विना तक्रार सुरु आहे. अश्या प्रकारचा इको फ्रेंडली उपक्रम पहिल्यांदाच एखाद्या देवस्थानाने राबवल्या बद्दल भक्तांनी ट्रस्टचे कौतुक केले आहे.
मठात रोख रकमेसोबतच कार्ड, ऑनलाईन बँक ट्रान्सफर तसेच चेक द्वारे देणगी देण्याची सोय उपलब्ध आहे. कार्ड द्वारे देणगी हि रु. ५०० व त्याच्यापुढे स्वीकारली जाते. चेक द्वारे देणगी देताना चेक चालू तारखेचा असावा.
ऑनलाईन ट्रान्सफर ट्रस्ट च्या खात्यात रक्कम जमा झाल्यावर पावती केली जाते. चेक “श्री सद्गुरू शंकर महाराज समाधी ट्रस्ट” या नावाने लिहावा. ऑनलाईन ट्रान्सफर साठी बँक ऑफ इंडिया खाते क्र. 050510110007533, आय.एफ.सी. कोड क्र. BKID0000505 याचा उपयोग करावा.
Contact – श्री सद्गुरू संतवर्य योगीराज शंकरमहाराज समाधी ट्रस्ट, पुणे-सातारा रोड, धनकवडी, पुणे ४११०४३.
Ph. No. – 020- 24373307/08.
WEBSITE – www.shankarmaharaj.com