नम्र निवेदन

Home / नम्र निवेदन

भक्तांना नम्र निवेदन

श्री सद्गुरू संतवर्य योगीराज शंकरमहाराज समाधी ट्रस्ट, पुणे-सातारा रोड, धनकवडी, पुणे ४११०४३ (रजिस्टर नं. ए – ७९३) या नावाने हि संस्था मुंबई सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था अधिनियम १९५० अन्वये नोंदणीकृत संस्था असून या संस्थेची अन्यत्र कोठेही शाखा नाही. 
श्री सद्गुरू संतवर्य योगीराज शंकरमहाराज समाधी ट्रस्ट, पुणे-सातारा रोड, धनकवडी, पुणे ४११०४३ (रजिस्टर नं. ए – ७९३) या नावाने हि संस्था मुंबई सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था अधिनियम १९५० अन्वये नोंदणीकृत संस्था असून या संस्थेची अन्यत्र कोठेही शाखा नाही. श्री सद्गुरू शंकरमहाराज समाधी मठ, पुणे-सातारा रोड, धनकवडी, पुणे –४११०४३ हे श्री सद्गुरू शंकर महाराजांचे एकमेव समाधीस्थान असून महाराजांचे कोणीही वंशज, अवतार किंवा उत्तराधिकारी नाहीत. बुवा बाजी करणाऱ्यांपासून सावध रहावे. श्री सद्गुरू शंकरमहाराज समाधी करिता पूजा साहित्य, समाधी सजावटीसाठी फुले, हार यांचा खर्च ट्रस्ट तर्फे केला जातो, तसेच पोशाख, अन्नदान, यज्ञ-याग, अभिषेक, देणगी आणि भेटवस्तू व शिधा ट्रस्टच्या कार्यालयात रीतसर पावती देवून स्वीकारला जातो. श्रींच्या भक्तांनी विना पावती, हस्ते-परहस्ते कोणाकडेही रोख रक्कम जमा करू नये. मठामधील कर्मचारी किंवा सेवेकरी यांच्यासोबत आर्थिक व्यवहार करू नयेत.
श्री सद्गुरू संतवर्य योगीराज शंकर महाराज समाधी ट्रस्ट यांचे कडून सेवेकरी व  भक्तांना नम्रपणे सूचित करण्यात येते की, या ट्रस्टचे ध्येय पैसा व प्रसिद्धीकरिता आटापीटा न करता भक्तांच्या श्रीं शंकर महाराजांवर असलेल्या श्रद्धेला, भावनेला तडा जाऊ न देता देणगी स्वीकारून उपलब्ध निधीतून समाधीची सेवा, अन्नदान, विकास कामे व मानवतेची सेवा घडावी हाच उद्देश समोर ठेवून काम करणे असा आहे. श्रीं शंकर महाराजांच्या नावाने महाराष्ट्रात अनेक ठिकाणी व्यक्ती वा ट्रस्ट सर्वस्वी मानवतेच्या सेवेत झोकून सेवा देत आहेत. परुंतु काही ठिकाणी संधीसाधु पणाचे प्रकार समोर येत आहेत. श्री शंकर महाराजांच्या नावाने योजनाबद्ध पद्धतीने पैसा जमा केला जातो आहे.

श्री शंकर महाराजांच्या पादुका, प्रासादिक मूर्ती, इतर वस्तु, सिगारेट-अंगारा, उदी वगैरे प्रसाद रूपाने मठा मधून मिळाली, श्रींच्या समाधीला स्पर्शकरून वस्तु आणल्या म्हणून अनेक लोक भावनिक संबंध जोडतात. तसेच मठातून मिळालेला प्रसाद घरपोच देऊन स्वार्थ साधण्याचा प्रयत्न करतात. अशा बाजारूपणा पासून सावध असावे. वस्तुत: ज्या काही वस्तू श्रींच्या कृपेमुळे प्राप्त झाल्या तसेच अनुभव, अनुभूती वगैरे हा त्यांचा वैयक्तिक भाग असावा. त्याची वाच्यता करता कामा नये व बाजारूपणा भक्तिभावनेत येऊ देऊ नये हीच ट्रस्टची अपेक्षा.

श्री शंकर महाराजांच्या प्रती असलेल्या अतूट श्रद्धेचा गैरफायदा घेऊन काही मंडळी श्रींच्या नावाचा संदर्भ देऊन दैवी उपाय सांगणे, शंकर महाराजांचा संचार येतो म्हणून अध्यात्मिक मार्गदर्शन करणे व भयनिर्माण करून भक्तांचे मन विचलीत करण्याचा प्रयत्न करीत आहेत. फेसबुक, वॉटसप वरील अनेक लेखांमधील शंकर महाराजांचा उल्लेख असलेली घटना, प्रसंग खरोखर घडलेली नसून तशी माहितीसुध्दा उपलब्ध नसते. काही मंडळी अशा लेखांव्दारे भाविकांमध्ये गोंधळ पसरविण्याचा व्यर्थ उपद्व्याप करीत आहेत. तरी भक्तांनी अशा अपप्रवृतीपासून सतर्क राहावे.

श्री शंकर महाराजांच्या वापरातील म्हणून कपडे, पादुका, प्रासादिक पादुका, श्रींच्या मुर्ति वा श्रींच्या तथाकथित वस्तु सर्वत्र मिरवणे चालु आहे. अशा प्रकारे प्रसिध्दी देऊन त्या वस्तु खऱ्या असतील तर ट्रस्टला न देता, ट्रस्टची परवानगी न घेता फिरवत बसणे, या मागे त्यांचा उद्देश काय असावा हे लक्षांत घ्यावे. “पादुका दर्शन सोहळा” अशा कार्यक्रमाद्वारे विशेष प्रचार करून पैसा जमा करण्याचे तंत्र उदयास येत आहे. अशा योजनेपासून सर्व भक्तांनी सावध राहावे.

श्रींच्या नावाने मंदिर, मठ, मंडळ, ट्रस्ट, प्रतिष्ठान, अन्नछत्र स्थापिल्या जातात. त्यासाठी परस्पर देणगी गोळा केली जाते. मठात अन्नदानासाठी म्हणून परिसरातील प्रतिष्ठित व्यक्ती, दुकानदार व बाहेर गावच्या भक्तांकडून पैसे, शिधा मागितला जातो. याचकरिता भक्तांनी सखोल चौकशी करून आपल्या श्रद्धा, विश्वासाला तडा न जाता मदत करण्याचा योग्य तो निर्णय घ्यावा. बोर्ड, बॅनर, फेसबुक, वॉटसप, प्रसिद्धी पत्रक व भावनिक बोलून प्रसिद्धी करणे अशा बाह्य प्रलोभनावर अजिबात विश्वास ठेऊ नये. डोळसपणे अवलोकन करावे व नंतरच काय ते ठरवावे. असा विषवृक्ष फैलू नये म्हणून देणगी देताना सर्वांनी दक्षता घ्यावी. भक्तांनी फसगत होऊ नये म्हणून वेळोवेळी मठामध्ये ट्रस्टच्या कार्यालयात संपर्क साधून माहिती घ्यावी. कोठे गैर कांही आढळल्यास ट्रस्टशी संपर्क साधावा.

श्री शंकर महाराजांची भक्ती व सेवा करण्यास पैसा लागत नाही. सुविधा व व्यवहाराकरिता पैसा लागतो, तो ही आवश्यक तितका. श्रींच्या नावाने स्वार्थरहित सेवा होत असेल तेथे योगदान, सहयोग देत रहावा. इतरत्र मात्र सतर्क राहावे. वरील गोष्टीची सर्व भक्तांनी कृपया नोंद घ्यावी.
विश्वस्त मंडळ

श्री सद्गुरू संतवर्य योगीराज शंकरमहाराज समाधी ट्रस्ट (रजिस्टर नं. ए – ७९३)
श्री सद्गुरू शंकरमहाराज समाधी मठ, पुणे-सातारा रोड, धनकवडी, पुणे –४११०४३ हे श्री सद्गुरू शंकर महाराजांचे एकमेव समाधीस्थान असून महाराजांचे कोणीही वंशज, अवतार किंवा उत्तराधिकारी नाहीत. बुवा बाजी करणाऱ्यांपासून सावध रहावे. श्री सद्गुरू शंकरमहाराज समाधी करिता पूजा साहित्य, समाधी सजावटीसाठी फुले, हार यांचा खर्च ट्रस्ट तर्फे केला जातो, तसेच पोशाख, अन्नदान, यज्ञ-याग, अभिषेक, देणगी आणि भेटवस्तू व शिधा ट्रस्टच्या कार्यालयात रीतसर पावती देवून स्वीकारला जातो. श्रींच्या भक्तांनी विना पावती, हस्ते-परहस्ते कोणाकडेही रोख रक्कम जमा करू नये. मठामधील कर्मचारी किंवा सेवेकरी यांच्यासोबत आर्थिक व्यवहार करू नयेत.