प्रचलित पद्धती व नियम
Home / प्रचलित पद्धती व नियम
पुजारी, ट्रस्टी, सेवेकरी अथवा भक्तांना पहाटेच्या स्नान-अभिषेकासाठी बनियन व लुंगी अशा प्रकारचा पोशाख किंवा सोवळे घालावे लागते.
आरती, नैवेद्य संस्थेचे कर्मचारी (पुजारी) करतात. विश्वस्त मान्यवर व्यक्ती व देणगीदार यांना आरती देवू शकतात. तसेच देणगी मूल्य भरून भक्तांना आरतीच्या नियामानुसार आरती करता येते. गाभाऱ्यात आरतीला मर्यादित व्यक्तींना प्रवेश दिला जातो.

गर्दी व सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून भक्तांना गाभाऱ्यात बसून ध्यान, भजन, जास्त वेळ उभे राहणे अथवा सिगारेट दाखवणे, उदबत्ती, कापूर, दिवा ओवाळणे अशा गोष्टी कोणत्याही वेळी करू दिल्या जात नाहीत. भिकारी, दारुडे व विनाकारण टाईमपास करणाऱ्या व्यक्तींना सेक्युरिटी मार्फत बाहेर काढले जाते.

अभिषेक, यज्ञ देणगी पावती करून संस्थेच्या नेमून दिलेल्या गुरुजींकडून केले जातात. तसेच नैवेद्य, प्रसाद मठात आचारी व कर्मचारी बनवतात. भक्तांना मोठ्या प्रमाणावर प्रसाद बनवून आणून परस्पर वाटण्याची परवानगी दिली जात नाही.
देणगी मूल्य भरून दुर्गाष्टमीच्या पालखीचे यजमानपद भक्तांना घेता येते. मागील तीन वर्षी ज्यांनी पालखी केली नाही अशा भक्तांना प्राधान्य दिले जाते. बुकिंग न झाल्यास यादीतील इच्छुक भक्तांना १०-१५ दिवस अगोदर सांगुन बुकिंग केले जाते.
वैशाख शुद्ध दुर्गाष्टमी, गुरुपोर्णिमा, दत्तजयंती या दिवशी पालखीचे यजमानपद, वीणा विश्वस्तांना दिली जाते. तसेच ट्रस्ट तर्फे ज्या पूजा व यज्ञ-याग केले जातात त्यासाठीचे यजमानपद विश्वस्तांना दिले जाते. सर्व भक्तांना सुखसमृद्धी मिळावी अशी महाराजांना प्रार्थना व संकल्प करण्यात येतो. भक्तांच्यावतीने व भक्तांसाठीची ही महाराजांची सेवा ट्रस्ट तर्फे विश्वस्तांनी करायची असते अशी मान्यता आहे.
प्रत्येक महिन्याच्या दुर्गाष्टमीस व महत्वाचे सणाचे दिवशी सकाळी अभिषेक स्नानानंतर श्रींना विविध प्रकारचे सुवर्णालंकार परिधान करण्यात येतात. गुरुपोर्णिमा, श्रींचा समाधी उत्सव, वैशाख शुद्ध दुर्गाष्टमी व महत्वाचे सणांचे दिवशी श्रींची सुवासिनीकडून मीठ-मोहरीने दृष्ट काढली जाते.
भक्तांनी दिलेल्या भेटवस्तूंवर अथवा देणगी दिल्याबद्दल त्यांचे नाव मठाच्या आवारात लावले जात नाही. भेटवस्तू ट्रस्टच्या कार्यालयात जमा केली जाते व तिचा योग्य वापर करण्याचा अधिकार विश्वस्तांना आहे.
मठात नित्य पूजेवेळी खालिल प्रकारे जयजयकार केला जातो.
।। सिद्धांत अवधूत चिंतन श्रीगुरु देव दत्त ।। श्री स्वामी समर्थ महाराज कि जय ।।
।। अनंतकोटी ब्रम्हाण्डनायक राजाधिराज योगीराज श्री सद्गुरू शंकरबाबा महाराज कि जय ।।
मठात मोफत व धार्मिक कार्यक्रमांचे, मंदिरांकडून आलेले फ्लेक्स विश्वस्तांच्या पूर्व परवानगीने लावले जातात. जाहिराती, प्रायोजक, देणगीदार व इतर कोणत्याही प्रकारचे फ्लेक्स मठात लावले जात नाहीत.
मठाच्या मुख्य आवारात, सभामंडप आणि गाभारा या ठिकाणी फोटो, व्हिडीओ शुटींग करण्यास व मोबाईलवर बोलण्यास मनाई आहे. मठाच्या फोटोग्राफरकडून श्रींचा फोटो काढला जातो व इतर कार्यक्रमाचे फोटोहि वेळोवेळी काढून अधिकृत फेसबुक पेज व वेबसाईटवर प्रसिद्ध केले जातात.
पोलीसांच्या आदेशानुसार गर्दी व सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून भक्तांना त्यांच्या गाड्यांचे पार्किग मठाच्या परिसरात करू दिले जात नाही.
गाभारा रात्री १०:३० वाजता बंद झाल्यानंतर मठाचे परिसरातील भक्तांना ११ पर्यंत सेक्युरिटी मार्फत बाहेर जाण्यास सांगितले जाते. मठाचे मुख्य प्रवेशद्वार रात्री ११ वाजता बंद केले जाते. त्यानंतर कर्मचारी, सेक्युरिटी खेरीज कोणालही मठात प्रवेश करण्यास, रहाण्यास परवानगी नसते. वार्षिक उत्सव, दुर्गाष्टमी व सण अशा वेळी सजावट साफसफाई असे रात्री काम करणे गरजेचे असते त्यावेळी सेवेकरी व बाहेरील कामगार यांना विश्वस्त परवानगी देवू शकतात.
दर्शन व्यवस्था
दर्शन व्यवस्था पूर्णतः मोफत आहे. दर्शनाकरिता कोणालाही शुल्क आकारले जात नाही. महाराजांसाठी सर्व भक्त समान आहेत परंतु काही सामाजिक संकेताप्रमाणे महत्वाच्या व्यक्तींसाठी वेगळी दर्शन व्यवस्था विश्वस्तांना करावी लागते. साधारणपणे गर्दीच्या दिवशी राजकीय नेते, निमंत्रित पाहुणे, उच्च पदस्थ अधिकारी व अपंग व्यक्तींना दर्शनासाठी अग्रक्रमाने प्रवेश दिला जातो व त्यांचा योग्य तो सन्मान केला जातो. गाभाऱ्याच्या पश्चिमेकडील लहान दरवाजातून कोणालाही प्रवेश दिला जात नाही. सध्या करोना संसर्गामुळे समाधीचे स्पर्श दर्शन बंद आहे.