प्रवचन

Home / प्रवचन

साद देती प्रस्तावना व प्रवचन लिहिणे

“सुख नि शांति म्हणजे काय आणि ते मिळवण्याचा सोप्यात सोपा उपाय किंवा मार्ग कोणता ?” प. पु. शंकर महाराज मार्गदर्शन.

(संदर्भ – साद देती हिमशिखरे… बाबा प्रधान)

त्याचे श्रींनी दिलेलं एक सुंदर विवेचन !
“जगात सुख नि शांति मिळवण्याकरिता प्रत्येक जण प्रयत्नाधीन आहे.” या सुख समाधानाला झाकोळून टाकणाऱ्या, काय नि कोणकोणत्या गोष्टी आहेत, हा ज्याचा त्याने विचार करायला हवा. आपल्या इच्छा, ईर्षा किंवा महत्वकांक्षा, वासना, अतृप्ती किंवा हावरेपणा, असूया वगैरे गोष्टींनी सारे जीवन गढ़ूळते नि असुख आणि अशांती निर्माण होऊन केविलवाणी मन:स्थिती उत्पन्न होते. यांना जर कोणत्या रीतीने टाळता आले, किंवा त्याची योग्य ती वासलात लावता आली, तर सुख, शांती, समाधान उत्पन्न होऊ शकेल.
जे आपले नाही ते मिळविण्याचा हव्यास, आपण जसे नाही तसे होण्याची महत्वाकांक्षा, जे आपले नाही ते धरून ठेवण्याची आणि आपण कोणी तरी आहोत ते सतत दाखविण्याची धडपड आज काल प्रत्येकाची चालू आहे.
जीवनावश्यक गोष्टींशिवाय आपण कितीतरी इतर गोष्टी मिळविण्याकरिता
उगाच धड़पडत असतो. हा जो पसारा आपल्याभोवती आपण निर्माण करुन ठेवतो, तोच जीवनात अपेक्षित सुख व समाधानाच्या वाटा रोखून धरीत असतो. जगात रहायचे, तर जगरहाटी प्रमाणे वागायला हवे, असा मूर्ख पणाचा मुद्दा पुष्कळदा पुढे करण्यात येतो.
आजचे जग कसे आहे हे पाहिले तर जिकडे-तिकडे निरनिराळे धर्म-पंथ-जाती-उपजाती नि निरनिराळे ‘वाद’ व मतप्रणाली यांचा नुसता गोंधळ माजला आहे. मी जी मते मानतो तीच खरी, मी आचरीत असलेली जीवनसरणीच काय ती खरी नि विचारपूर्वक आखलेली नि तिचा अवलंब प्रत्येकाने करायलाच हवा, हाच आग्रह पावलोपावली चाललेला असून, आपली मते दुसऱ्यावर लादण्याचाच आटोकाट प्रयत्न सगळीकड़े चाललेला आजच्या जगात दिसतो. त्यामुळे होते असे की, आपले प्रभुत्व, किंवा पुढारीपण, आपली प्रभावळ वा अनुयायी, आपले व्यक्तित्व, आपली सत्ता नि मत्ता इ. कायम टिकवण्याकरिता अव्याहत चाललेला झगडा हेच जणू जीवन, अशी चुकीची विचारसरणी बद्धमूल होऊन बसली आहे.
त्याचे श्रींनी दिलेलं एक सुंदर विवेचन !
“जगात सुख नि शांति मिळवण्याकरिता प्रत्येक जण प्रयत्नाधीन आहे.” या सुख समाधानाला झाकोळून टाकणाऱ्या, काय नि कोणकोणत्या गोष्टी आहेत, हा ज्याचा त्याने विचार करायला हवा. आपल्या इच्छा, ईर्षा किंवा महत्वकांक्षा, वासना, अतृप्ती किंवा हावरेपणा, असूया वगैरे गोष्टींनी सारे जीवन गढ़ूळते नि असुख आणि अशांती निर्माण होऊन केविलवाणी मन:स्थिती उत्पन्न होते. यांना जर कोणत्या रीतीने टाळता आले, किंवा त्याची योग्य ती वासलात लावता आली, तर सुख, शांती, समाधान उत्पन्न होऊ शकेल.
जे आपले नाही ते मिळविण्याचा हव्यास, आपण जसे नाही तसे होण्याची महत्वाकांक्षा, जे आपले नाही ते धरून ठेवण्याची आणि आपण कोणी तरी आहोत ते सतत दाखविण्याची धडपड आज काल प्रत्येकाची चालू आहे.
जीवनावश्यक गोष्टींशिवाय आपण कितीतरी इतर गोष्टी मिळविण्याकरिता उगाच धड़पडत असतो. हा जो पसारा आपल्याभोवती आपण निर्माण
करुन ठेवतो, तोच जीवनात अपेक्षित सुख व समाधानाच्या वाटा रोखून धरीत असतो. जगात रहायचे, तर जगरहाटी प्रमाणे वागायला हवे, असा मूर्ख पणाचा मुद्दा पुष्कळदा पुढे करण्यात येतो.
आजचे जग कसे आहे हे पाहिले तर जिकडे-तिकडे निरनिराळे धर्म-पंथ-जाती-उपजाती नि निरनिराळे ‘वाद’ व मतप्रणाली यांचा नुसता गोंधळ माजला आहे. मी जी मते मानतो तीच खरी, मी आचरीत असलेली जीवनसरणीच काय ती खरी नि विचारपूर्वक आखलेली नि तिचा अवलंब प्रत्येकाने करायलाच हवा, हाच आग्रह पावलोपावली चाललेला असून, आपली मते दुसऱ्यावर लादण्याचाच आटोकाट प्रयत्न सगळीकड़े चाललेला आजच्या जगात दिसतो. त्यामुळे होते असे की, आपले प्रभुत्व, किंवा पुढारीपण, आपली प्रभावळ वा अनुयायी, आपले व्यक्तित्व, आपली सत्ता नि मत्ता इ. कायम टिकवण्याकरिता अव्याहत चाललेला झगडा हेच जणू जीवन, अशी चुकीची विचारसरणी बद्धमूल होऊन बसली आहे.
भोवताली चाललेल्या धुमश्चक्रीत तुम्हाला सुख हाती लागायचे कसे? तुम्हाला नीरव शांतता हवी असली, तर ती या बाजारी गलबल्यात मिळायची कशी? इथे देणे नि घेणे – माझे नि तुझे याशिवाय भाषा नाही, हालचाल नाही, कर्तव्य नाही! तुम्ही येथे बहुसंख्येने जमला आहात, ‘ऐका हो, ऐका!’ असे एकमेकांना सुनावत जर सगळेच ओरडू लागलात, तर मी काय बोलतो ते कुणाला तरी नीट ऐकू येऊ शकेल का ? कधीच नाही. प्रत्येक जण स्वतः शांत राहिला, तरच या जगात शांतता राहू शकेल. नि तेव्हाच सर्वांना ऐकण्याचा आनंद मिळू शकेल. त्याचप्रमाणे आपली जीवनसरिता ज्यामुळे गढ़ूळ होत आहे, त्या त्याज्य गोष्टींपासून जेव्हा आपण दूर असू वा त्यांचा अडथळा जेव्हा आपण आपल्या हाताने बाजूला करू, तेव्हाच जीवन, सुख- शांतिपूर्ण होईल. नीरव शांततेचा लाभ बाजारातल्या गोंगाटात कधी तरी होईल काय?