मठाविषयी

Home / मठाविषयी

ll श्री सद्गुरू शंकर महाराज मठ ll

पुणे शहरात स्वारगेट कडून कात्रजकडे जाताना पुणे – सातारा रस्त्याच्या डाव्या बाजूस स्वारगेटपासून सुमारे चार किलोमीटर अंतरावर, पद्मावतीच्या पुढे श्री शंकर महाराज उड्डाणपूलाच्या डाव्या बाजूने पुढे आल्यावर धनकवडी येथे श्री शंकर महाराजांचा समाधी मठ (समाधीस्थान) आहे. तेथे जाण्यासाठी स्वारगेट, शिवाजीनगर व कात्रज येथुन बसची सोय आहे.
सुमारे एक एकर जागेत हे समाधी मंदिर आहे. उत्तर दिशेस सातारा रोड वर मठाचे प्रवेशद्वार आहे. प्रवेशद्वारातून आत आल्याबरोबर डाव्या बाजूला चप्पल स्टँड तर उजवे बाजूस हात-पाय धुण्याची सोय आहे. हात व पाय धुवूनच गाभाऱ्यात जाण्याचा रिवाज आहे. समाधी मंदिर दक्षिणोत्तर आहे. दारातून गेल्यावर प्रशस्त सभामंडप असून त्याच्या मध्यभागी मोठे यज्ञकुंड आहे. तेथे दरमहा विविध याग संपन्न होतात.
समोरच दगडी बांधणीचा गाभारा आहे. गाभाऱ्यात श्रींची संगमरवरी 

बांधणीची भव्य समाधी व सुरेख संगमरवरी मूर्ती आहे. मूर्तीच्या मागे चांदीची प्रभावळ आहे. मूर्तीच्या पुढे दक्षिणोत्तर अशी महाराजांची समाधी आहे. गाभाऱ्यामध्ये महाराजांचे निरनिराळ्या पोषाखांमधील फोटो लावलेले आहेत. समाधीच्या उजव्या बाजूस श्री स्वामी समर्थांचा फोटो व पादुका आहेत तसेच देवळीत श्री गजाननाची मूर्ती आहे. तर डाव्या बाजूस सोलापूरच्या जनुकाकांचा (जनार्दनस्वामी) यांचा फोटो आहे
गाभाऱ्याचे मागील बाजूस ट्रस्ट चे कार्यालय व महाराजांचे शेजघर आहे. शेजघरात महाराजांच्या काही वस्तू संग्रहित केल्या आहेत. मठात अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ, माणिकनगरचे श्री माणिकप्रभू, विडणीचे श्री शिवाजी महाराज, पैजारवाडीचे श्री चिले महाराज यांच्या जुन्या तसबिरी देखील आहेत. सभामंडपाच्या वरच्या मजल्यावर ध्यान मंदिर आहे.
ध्यान मंदिरात श्री अक्कलकोट स्वामी व श्री शंकर महाराजांच्या भव्य तसबिरी आहेत. सामुहिक ग्रंथ पारायण तसेच मठातील इतर धार्मिक कार्यक्रमांसाठी ध्यान मंदिराचा उपयोग होतो.
मंदिराचे बाहेर मारुती, श्री दत्तगुरु व अक्कलकोट स्वामी समर्थ यांची छोटी छोटी मंदिरे तसेच विहीर आहे. विहिरीला बाराही महिने पाणी असते. मारुती मंदिर दक्षिणाभिमुख असून आत हनुमंताची रेखीव काळ्या पाषाणात घडविलेली मूर्ती आहे. येथुन श्री शंकर महाराजांच्या मूर्तीचे समोरून दर्शन होते. दत्त मंदिराच्या समोर वडाचा पुरातन वृक्ष आहे. त्याखाली संगमरवरी पादुका आहेत.
सध्या भव्य प्रसादालय असलेल्या इमारतीचे काम पूर्ण झाले असून तेथे अन्नदान, महाप्रसाद, दवाखाना, बालवाडी तसेच इतर सामाजिक उपक्रम राबवले जातात. तसेच महाराजांचे जीवनावर आधारित कालादालन देखील निर्माण करण्यात आले आहे. सोमवार, गुरुवार व दुर्गाष्टमीस मठात मोठी गर्दी असते.
मठाचे व्यवस्थापन श्री सद्गुरू संतवर्य योगीराज शंकर महाराज समाधी ट्रस्ट नोंदणी क्र. ए ७९३ पुणे यांचे तर्फे करण्यात येते.