शंका समाधान

Home / शंका समाधान

वारंवार विचारण्यात येणारे प्रश्न (शंका समाधान )

पुणे शहरात स्वारगेट कडून कात्रजकडे जाताना पुणे – सातारा रस्त्याच्या डाव्या बाजूस स्वारगेटपासून सुमारे चार किलोमीटर अंतरावर, पद्मावतीच्या पुढे श्री शंकर महाराज उड्डाणपूलाच्या डाव्या बाजूने पुढे आल्यावर धनकवडी येथे श्री शंकर महाराजांचा समाधी मठ (समाधीस्थान) आहे. तेथे जाण्यासाठी स्वारगेट, शिवाजीनगर व कात्रज येथुन बसची सोय आहे.
सुमारे एक एकर जागेत हे समाधी मंदिर आहे. उत्तर दिशेस सातारा रोड वर मठाचे प्रवेशद्वार आहे. प्रवेशद्वारातून आत आल्याबरोबर डाव्या बाजूला चप्पल स्टँड तर उजवे बाजूस हात-पाय धुण्याची सोय आहे. हात व पाय धुवूनच गाभाऱ्यात जाण्याचा रिवाज आहे. समाधी मंदिर दक्षिणोत्तर आहे. दारातून गेल्यावर प्रशस्त सभामंडप असून त्याच्या मध्यभागी मोठे यज्ञकुंड आहे. तेथे दरमहा विविध याग संपन्न होतात.
समोरच दगडी बांधणीचा गाभारा आहे. गाभाऱ्यात श्रींची संगमरवरी 
1. श्रींचा मठ उघडण्याची व मठ बंद होण्याची वेळ कशी आहे ?
श्रींचा मठ व आवार पहाटे ०४:३० वाजता उघडते व रात्री १०:३० वाजता गाभारा व ११.०० वाजता मठ आवार बंद करण्यात येते.

 

२. श्रींकरीता सोबत आणलेले वस्त्र, विविध पूजा साहित्य, नैवेद्य कोठे द्यावे लागेल ?
श्रींचे दर्शनाकरीता जात असतांना सोबत आणलेले पूजा साहित्य गाभाऱ्या मधील गुरुजींकडे देणे. मौल्यवान वस्तु असल्यास श्री चरणी अपर्ण करून, संस्थेच्या ऑफिस मध्ये जमा करून अधिकृत पावती घेणे.

 

३. मठातील खिचडीचा प्रसाद किती वाजता मिळेल ?
महाप्रसाद भक्तांना दररोज सकाळी ०७.००, दुपारी १२.०० व सायंकाळी ०६.३० वाजता आरती नंतर वितरीत करण्यात येतो. दर सोमवार आणि गुरुवार महाप्रसादाची वेळ दुपारी १२.३० ते दुपारी ०२:०० पर्यंत असते. दरमहा दुर्गाष्ट्मीस महाप्रसादाची वेळ संध्याकाळी ०५.०० ते रात्री १०.३० पर्यंत असते. दरवर्षी समाधी सोहळ्यानिमित्त वैशाख शुध्द दुर्गाष्ट्मीस भक्तांना दिवसभर महाप्रसाद देण्यात येतो.

 

४. श्रींचे पालखीचे दर्शन घ्यावयाचे असल्यास कसे घेता येईल ?
मठामध्ये दर महिन्याची शुद्ध अष्टमी म्हणजेच दुर्गाष्टमी साजरी केली जाते. दुर्गाष्ट्मीस तसेच गुरुपौर्णिमा, दत्तजयंती उत्सवाप्रसंगी श्रींच्या पालखीची परिक्रमा मठाच्या आवारात संपन्न होते. त्यावेळी आपणाला पालखीचे दर्शन घेता येईल.

 

५. नामस्मरण काय करावे व श्रींच्या उपासनेसाठी कोणता ग्रंथ वाचावा ?
मठात “महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ”, हा जप केला जातो. उत्सवात  “जयजय गुरुमहाराज गुरु जयजय परब्रम्ह सद्गुरू” असा जप वीणेवर केला जातो. तसेच नित्यपाठ, शंकरगीता, गुरुचरित्र, ज्ञानेश्वरी, दासबोध, शिवलीलामृत, श्री गुरुलीलामृत आदी ग्रंथांचे पारायण केले जाते.

 

६. महाराजांच्या समाधीविषयी ?
समाधी कशी घेतली याची माहिती लिहिणे.

 

७. भक्तनिवासाची व्यवस्था आहे का ?
सध्या ट्रस्ट तर्फे भक्तनिवासाची सोय उपलब्ध नाही. परंतु परिसरात असलेल्या लॉज मध्ये राहण्याची सोय होऊ शकते.