संस्थेचे सेवाकार्य

Home / संस्थेचे सेवाकार्य

श्री शंकर महाराज समाधी मठाच्या वतीने राबवण्यात येणारे सामाजिक उपक्रम:

१. बालवाडी:

ट्रस्ट तर्फे लहान गट व मोठा गट असे बालवाडी वर्ग शिक्षिका मार्फत नियमित चालविले जातात. दररोज मुलांना पोषक आहार दिला जातो. बालक मंदिरातील मुलांसाठी दर वर्षी मोफत गणवेश, वार्षिक सहल, आषाढी एकादशी निमित्त पालखी, विविध खेळा व गॅदरिंगचे आयोजन ट्रस्ट तर्फे करण्यात येते.

२. धर्मादाय दवाखाना:

संस्थेतर्फे धर्मार्थ दवाखाना मोफत चालवला जातो. त्यासाठी संस्थेतर्फे मानधन देवून डॉक्टरांची नेमणूक केली जाते. काही सेवाभावी डॉक्टरांची विनामोबदला मदत घेतली जाते. सदर आरोग्य केंद्रात तपासणी करून मोफत ओषधे दिली जातात. त्याच बरोबर मोफत आरोग्य तपासणी शिबीर, रक्तदान शिबीर, नेत्र तपासणी शिबीर इत्यादी कार्यक्रम राबवले जातात.

३. आरोग्य तपासणी शिबीर:

मठाच्या वतीने वर्षातून वेळोवेळी आरोग्यतपासणी शिबीर, नेत्र तपासणी शिबीर, ई. आयोजित करण्यात येतात. ह्या शिबिरांच्या माध्यमातून गरजुंचे रोगनिदान करून पुढील उपचारांन करीता मार्गदर्शन करण्यात येते. नेत्र तपासणी द्वारे चाश्म्यांचे नंबर ठरवून मोफत चाश्म्यांचे वाटप करण्यात येते.

४. रक्तदान शिबीर

मठाच्या वतीने दरवर्षी रक्तदान शिबीर भरवण्यात येते.

४. रक्तदान शिबीर

मठाच्या वतीने दरवर्षी रक्तदान शिबीर भरवण्यात येते.
१५ ऑगस्ट आणि २६ जानेवारी ह्या दिवशी सकाळी ८:०० वा मठात ध्वजारोहण संपन्न होते यात बालक मंदिरातील सर्व मुले व ट्रस्टी उत्साहाने सहभागी होतात.

सामाजिक बांधिलकी

आपल्या समाजात असेही लोक आहेत ज्यांना अन्नधान्याची खरोखरीच अत्यंत गरज आहे. याच सामाजिक जाणिवेतून आपण ट्रस्टकडे शिल्लक असलेला जास्तीचा तांदूळ व शिधा अंधमुले, अपंग, मतिमंद लोकांना सांभाळत असलेल्या संस्था, अनाथाश्रम अशा रजिस्टर सामाजिक संस्थांना दिला जातो.