संस्थेविषयी

Home / संस्थेविषयी

संस्थेची माहिती, घटना, स्थापना, नेमणूक प्रक्रिया,  ई विषयी माहिती
ट्रस्टी व व्यवस्थापन माहिती
न्यासाचा कारभार हा योग्य व्यक्तींच्या हातात असावा. सदर व्यक्ती महाराजांच्या भक्त असाव्यात. विश्वस्तांनी सुरु केलेली कार्ये पुढे चालवणाऱ्या, संस्थेला मदत करणाऱ्या, संस्थेच्या प्रगतीस हातभार लावणाऱ्या व सेवाभाव असणाऱ्या व्यक्तींची विश्वस्तपदी नियुक्ती व्हावी म्हणून विद्यमान विश्वस्त मंडळाने निवडलेल्या दहा व्यक्तींच्या यादीतूनच सात पात्र व्यक्तींची निवड सक्षम अधिकाऱ्याने (मा. सहाय्यक धर्मादाय आयुक्त, पुणे) करावी, जेणेकरून विश्वस्त मंडळ तयार होताना त्यात जुन्या अनुभवी व नवीन उत्साही व्यक्तीची निवड होऊन समतोल साधला जाईल. न्यासाची स्थापना करताना अशा प्रकारची परिपूर्ण योजना महाराजांच्या प्रेरणेने तयार करण्यात आली होती. त्यानुसार संस्थेचे कार्य चालविण्यात येते.

व्यवस्थापक

मठाचा कारभार पहाण्यासाठी अनुभवी व्यवस्थापकची नेमणूक करण्यात येते. हिशोब ठेवणे, बँक भरणा करणे, कागदपत्रे व रेकॉर्ड सांभाळून ठेवणे, कर्मचारी व्यवस्थापन करणे, दैनंदिन देखभाल करणे, अध्यक्ष सचिव यांच्याशी वेळोवेळी संपर्क साधून माहिती देणे व मठाचा दैनंदिन कारभार सुरळीत ठेवणेची सर्व जबाबदारी व्यवस्थापकाकडे असते. कर्मचारी व हंगामी कामगार नेमून ती पूर्ण केली जाते.

माहिती पुस्तिका

वर्षभर साजरे होणारे सण, उत्सव, संस्थेचे कार्यक्रम, नियम तसेच नित्यपूजा, परंपरा, धार्मीक कामे, उपलब्ध सेवा व देणगी मूल्य यांची एक माहिती पुस्तिका तयार केली आहे. त्यात नमूद केलेले सर्व नियम व पध्दती राबवण्याची जबाबदारी विश्वस्तांची असून त्यात बदल करावयाचे असल्यास कार्यकारीणीच्या सभेमध्ये सर्वांची समंती घेवून किंवा बहुमताने केले जातात. कोण्या एखाद्या विश्वस्तांना त्यात बदल करण्याचा अधिकार नाही.