श्रीसद्गुरु शंकरमहाराज यांनी वैशाख शुद्ध अष्टमी, शके १८६९ अर्थात सोमवार, दिनांक २८ एप्रिल १९४७ रोजी पुणे – सातारा हमरस्त्यावर धनकवडी येथे देह ठेवला. या विश्व परमात्म्याने मृत्यूलोकी अनंत अवतार घेऊन संसाररूपी सागरातील मानवांना शक्ती देण्याचे, मार्गदर्शन करण्याचे कार्य केले आहे. श्रीशंकर महाराज कुठे जन्मले, त्यांचे वय काय, आईवडील कोण, त्यांचे गुरु कोण, या गोष्टी शेवटपर्यंत अज्ञातातच राहिल्या. परंतु महाराज देहधारी असताना त्यांच्याविषयी सर्वांनाच गूढ वाटे. श्रीसद्गुरु शंकरमहाराज हे प्रत्यक्ष शंकराचे अवतार असून जगाच्या कल्याणा प्रभुंच्या विभूती याला अनुसरून ते मानवरूपात प्रगटले. सृष्टीच्या नियमाप्रमाणे अशा जगदोद्धारक श्रीशंकरमहाराजांनी जरी देह ठेवला असला तरी त्यांचे अस्तित्व हे कायमच आहे.
भाविकांना श्रीमहाराजांचे घरबसल्या दर्शन व्हावे या हेतूने लाईव्ह दर्शन सुविधा उपलब्ध केली आहे. या माध्यमातून भाविकांना आता कोणत्याही क्षणी श्रीमहाराजांचे दर्शन घेता येते.
श्रीसद्गुरू शंकर महाराजांच्या समाधीची देखभाल करणे हे ट्रस्टचे नित्य आणि प्रमुख उद्दिष्ट आहे. समाधी मठातील धार्मिक नित्योपचार, यज्ञयागादी धार्मिक कृत्यांसह सामाजिक बांधिलकी जपत समाजाभिमुख कार्यक्रम राबविण्यात ही ट्रस्ट नेहमीच अग्रेसर राहते. संस्थेचे सर्व विश्वस्त, सेवेकरी व कर्मचारीवृंद अत्यंत सेवाभावी वृत्तीने श्रीमहाराजांचे हे कार्य वर्षानुवर्षे उत्तमरीत्या चालवित आहेत.
मंगळवार, दि. १३ ऑगस्ट २०२४
सोमवार, दि. ०५ ऑगस्ट ते
मंगळवार, दि. ०३ सप्टेंबर २०२४