श्रींच्या गाभाऱ्याची वेळ : पहाटे ०४:३० ते दुपारी ०१:०० व दुपारी ३:३० ते रात्री १०:३०
पहाटे ०४:०० वाजता मठाचे मुख्य प्रवेश द्वार व ०४:३० वाजता श्रींचा गाभारा उघडला जातो.
श्रींचा अभिषेक व नित्य पूजा : सकाळी ५.४५ पर्यंत संपन्न होते.
गुरुवार, दुर्गाष्टमी व सणाचे दिवशी गाभारा दुपारी पूर्ण वेळ उघडा असतो.
गाभारा व सभामंड़प बंद :
दुपारी १ ते ३.३० दरम्यान श्रींची विश्रांतीची वेळ असल्यामुळे गाभारा व सभामंड़प बंद ठेवला जातो, तसेच दुर्गाष्टमी व इतर मोठे सणा दिवशी गाभारा दर्शनासाठी खुला असतो. दुपारी २ ते ३.०० दरम्यान समाधी सजावट, साफसफाई यासाठी कर्मचारी व सेवेकरी गाभाऱ्यात असतात.
श्रीं च्या नैवेद्या ची वेळ : दररोज सकाळी अभिषेकाचे नंतर ५:३० ते ५:४५ दरम्यान व दुपारी ०३:०० ते ३:१५ दरम्यान श्रींना चहा व सिगारेट चा नैवेद्य दाखवला जातो. या वेळी दर्शन थांबवले जाते. तसेच दररोज दुपारी ११:३० व सायं ०६:०० वाजता श्रींना महानैवेद्य होतो. त्रिकाल आरती नंतर द्रोणात प्रसाद (अन्नदान) वाटला जातो तसेच दर सोमवार व गुरुवार दुपारी १२ ते २ या वेळात महाप्रसाद सुरु करण्यात आला आहे.
दररोज सकाळी व संध्याकाळी आरती पूर्वी वातावरण शुद्धी साठी संपूर्ण मठात धूप फिरवला जातो.
त्रिकाळ आरती : सकाळी ०७:००, दुपारी १२:०० आणि सायं ०६:३०
(रोज आरतीच्या आधी १५ मिनिटे श्री स्वामी समर्थ असा नाम जप केला जातो व शंख नादाने आरतीची सुरुवात होते.) आरती संस्थेचे कर्मचारी (पुजारी) करतात.
रात्री १० च्या सुमारास शेजघर, समाधी व गाभारा स्वच्छ करून श्रींचा पोशाख बदलला जातो. त्यानंतर शेजवस्त्र (मूर्तीला लोकरीची कानटोपी, मूर्ती व समाधीवर गरम शाल) परिधान केली जाते. महाराजांच्या नावाचा जय जयकार करून गाभारा १०:३० वाजता बंद होतो.
दर सोमवार व गुरुवार भजन सेवा रात्री ०८:३० ते १०:०० तसेच ट्रस्टचे नैमित्तिक कार्यक्रम असल्यास कार्यक्रमानंतर भजन सेवा होते.
दर एकादशीस संप्रदायिक (वारकरी) कीर्तन व द्वादशी दिवशी नारदीय कीर्तन संध्याकाळी ७:१५ ते ९:१५ या वेळात संपन्न होते. दर दुर्गाष्टमीस व उत्सवात आठ दिवस पहाटे ५ ते ६.४५ सांप्रदायिक (वारकरी) काकड आरती भजन होते.