निवेदन

निवेदन

१. श्री सद्गुरू संतवर्य योगिराज शंकर महाराज समाधी ट्रस्ट, पुणे-सातारा रोड, धनकवडी, पुणे-४११०४३ (रजिस्टर नं. ए०७९३) या नावाने ही संस्था मुंबई सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था अधिनियम १९५० अन्वये नोंदणीकृत संस्था असून या संस्थेची अन्यत्र कोठेही शाखा नाही.

२. श्री सद्गुरू शंकर महाराज समाधी ट्रस्ट (मठ), पुणे-सातारा रोड, धनकवडी, पुणे-४११०४३. हे श्री सद्गुरू शंकर महाराजांचे एकमेव समाधीस्थान असून महाराजांचे कोणीही वंशज, अवतार किंवा उत्तराधिकारी नाहीत. बुवाबाजी करणाऱ्यांपासून सावध रहावे.

३. श्री सद्गुरू शंकर महाराज समाधी करिता पूजा-साहित्य, समाधी सजावटीसाठी फुले, हार यांचा खर्च ट्रस्टतर्फे केला जातो. तसेच पोशाख, अन्नदान, यज्ञ-याग, अभिषेक, देणगी आणि भेटवस्तू व शिधा ट्रस्टच्या कार्यालयात रितसर पावती देवून स्विकारला जातो.

४. श्रींच्या भक्तांनी विना पावती, हस्ते परहस्ते कोणाकडेही रोख रक्कम जमा करू नये. मठामधील कर्मचारी किंवा सेवेकरी यांच्या सोबत आर्थिक व्यवहार करू नयेत.

वरील गोष्टींची सर्व भक्तांनी कृपया नोंद घ्यावी व मठाचे परिसरात पावित्र्य राखावे.